छोटा टेम्पोची दुचाकीला धडक; एक जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:07 IST2021-07-14T04:07:02+5:302021-07-14T04:07:02+5:30
वेरूळ : खुलताबाद तालुक्यातील वेरुळ ते आखतवाडा रस्त्यावर मंगळवारी एका छोट्या टेम्पोने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. ...

छोटा टेम्पोची दुचाकीला धडक; एक जण ठार
वेरूळ : खुलताबाद तालुक्यातील वेरुळ ते आखतवाडा रस्त्यावर मंगळवारी एका छोट्या टेम्पोने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला, तर एक जण जखमी झाला आहे. योगेश अर्जुन लघाने (३०, रांजणगाव खुरी, ता. पैठण) असे मयताचे, तर अंकुश नामदेव बोराडे (३२, रा. वडगाव, ता. गंगापूर) असे जखमीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास योगेश लघाने व अंकुश बोराडे हे दोघे दुचाकी (क्र. एमएच २०, डी डब्ल्यू ४११४)ने वेरुळ ते आखतवाडा रस्त्याने पिंप्रीकडे जात होते. तर त्याच वेळी पिंप्रीकडून येणाऱ्या छोटा टेम्पो (क्र. एमएच २० ईएल ५२८४)ने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली. यात दोघेही दूर फेकल्या गेले. यात योगेश लघाने हे जागीच ठार झाले. तर अंकुश बोराडे हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच खुलताबाद पोलीस ठाण्याचे बिट जमादार मनोहर पुंगळे, वाल्मीक कांबळे, संजय ठोंबरे हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमीला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी खुलताबाद ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास पोनि. सीताराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार राम छत्रे, पोहेकॉ. मनोहर पुंगळे करीत आहेत.
फोटो :
130721\1855-img-20210713-wa0004.jpg
आखतवाडा-पिंपरी रस्त्यावर महिंद्रा पिकप व दुचाकीचा अपघात एकजण जागीच ठार, एक जखमी