शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...
4
वर्दीतली माणुसकी! एकही पणती विकली गेली नाही; पोलिसांनी 'असं' आणलं आजीच्या चेहऱ्यावर हसू
5
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
6
खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला
7
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
8
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
9
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
10
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
11
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
12
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
13
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
14
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
16
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
17
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
18
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
19
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
20
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास

कमिशन देत मजूर, गरिबांद्वारे गांजाची छोट्या प्रमाणात तस्करी; कर्नाटकचा फळ विक्रेता अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 18:30 IST

रेल्वे स्थानकाकडून बाबा चौकात उतरलेल्या तरुणाकडे गांजाच्या पिशव्या असल्याची माहिती गुप्त बातमीदाराने छावणी पोलिसांना दिली.

छत्रपती संभाजीनगर : कमिशनचे आमिष दाखवून मजूर, गरीब कुटुंबांकडून राज्यभरात गांजाची तस्करी सुरू आहे. त्यात कमी प्रमाणात गांजा मिळाल्यास शिक्षेची तरतूदही कमी असल्याने त्यांच्याद्वारे छोट्या छोट्या पिशव्यांतून गांजा व तत्सम अमली पदार्थांची तस्करी सुरू असल्याची बाब समोर आली आहे. छावणी पोलिसांनी नुकतेच कर्नाटकच्या यादगीर जिल्ह्यातील शेख महेबूब शेख नूर मोहम्मद (वय २६) या फळ विक्रेत्याला पकडल्यानंतर ही बाब निदर्शनास आली.

रेल्वे स्थानकाकडून बाबा चौकात उतरलेल्या तरुणाकडे गांजाच्या पिशव्या असल्याची माहिती गुप्त बातमीदाराने छावणी पोलिस ठाण्याचे प्रभारी डॉ. विवेक जाधव यांना दिली होती. वरिष्ठांची परवानगी घेत जाधव, उपनिरीक्षक काकासाहेब नागवे यांनी १४ ऑक्टोबर रोजी ११:१५ वाजण्याच्या सुमारास बाबा चौकातील (भगवान महावीर चौक) लष्कराच्या मेससमोर सापळा रचला. गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार, त्या वर्णनाचा तरुण येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील कपड्याच्या पिशवीत गांजा आढळताच तज्ज्ञांच्या मदतीने तपासणी करण्यात आली. त्यांच्या अहवालानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याचे सहायक निरीक्षक विवेक जाधव यांनी सांगितले.

छोट्या प्रमाणात तस्करी, कायद्यातून सूटछोट्या, अल्प प्रमाणात गांजा आढळल्यास शिक्षेची तरतूद कमी आहे. कायद्यातील ही पळवाट माहीत झाल्याने तस्करांकडून आता मोठ्या स्वरूपात गांजा व तत्सम अमली पदार्थांची तस्करी करणे बंद झाले. गरीब, मजूर, महेबूबसारख्या फळ विक्रेत्यांना पैशांचे आमिष दाखवून मागणीनुसार पाठवले जाते. त्यांना संबंधित शहर, गावातील माल स्वीकारणाऱ्या व्यक्तीचा केवळ मोबाइल क्रमांक दिलेला असतो. शहरात उतरल्यानंतर त्यांच्याकडे काेड सांगून माल पोहोचवून परतण्याची भूमिका त्यांची असते. यासाठी त्यांना तिकीट, जेवणासह तस्करीचे पुरेसे पैसे दिले जातात. विशेष म्हणजे, महिलांवर संशय कमी येत असल्याने त्यांचा या तस्करीत अधिक वापर होत असल्याचे यापूर्वीच्या कारवाईवरून अनेकदा स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात शेख महेबूबला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला १८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Laborers Smuggling Ganja for Commission; Fruit Vendor Arrested

Web Summary : Lured with commission, poor laborers are smuggling ganja across Maharashtra. A Karnataka fruit vendor was arrested in connection with this illegal activity. Small quantities exploit lenient penalties.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर