लहान आगीमुळे मोठी दुर्घटना टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:35 IST2017-11-07T00:35:47+5:302017-11-07T00:35:51+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीसी सभागृहाला वीजपुरवठा करणा-या जंक्शन बॉक्समध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे दुपारी १ वाजेदरम्यान लागलेल्या आगीने जिल्हा प्रशासनाची धांदल उडविली.

लहान आगीमुळे मोठी दुर्घटना टळली
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीसी सभागृहाला वीजपुरवठा करणा-या जंक्शन बॉक्समध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे दुपारी १ वाजेदरम्यान लागलेल्या आगीने जिल्हा प्रशासनाची धांदल उडविली. लोकशाही दिनाच्या तक्रारींवर जिल्हाधिकारी दालनालगतच्या छोट्या सभागृहात सुनावणी सुरू होती, त्याऐवजी डीपीसी सभागृहात जर सुनावणी सुरू असती तर मोठा गदारोळ होऊन दुर्घटना घडली असती. आगीमुळे जीवित आणि वित्तहानी झाली नाही.
त्या सभागृहाची ये-जा करणारे दरवाजे लहान आहेत. शिवाय आपत्कालीन दरवाजालगत असलेला जिना रद्दीने आणि निकामी साहित्यामुळे बंद पडल्यासारखाच आहे. सोमवार आणि कामकाजाचा पहिलाच दिवस असल्यामुळे कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. शॉर्टसर्किटमुळे आग लागण्यापूर्वी झालेल्या आवाजामुळे सुनावणी हॉलमध्ये असलेले उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, क्लार्क मीर जाफर अली यांनी डीपीसी सभागृहाकडे धाव घेतली. तेथील फायर इश्टिंगशर उघडून सीओटूची फवारणी केली. त्यामुळे आग तातडीने आटोक्यात आली; परंतु जिल्हाधिका-यांच्या दालनाकडे आणि सभागृहाकडे जाणाºया मार्गावर धुराचे साम्राज्य निर्माण झाले. फायर इश्टिंगशरमधील सीओटूच्या फवारणीनंतर धुळीकणांमुळे अनेकांच्या घशाला त्रास झाला. डीपीसी सभागृहात तब्बल तीन तासांपर्यंत घुसमट करणारे वातावरण होते.