कस्टम ड्यूटी वाढविल्यामुळे लघु उद्योगांना फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:11 IST2021-02-05T04:11:38+5:302021-02-05T04:11:38+5:30
कस्टम ड्यूटी वाढविल्यामुळे लघु उद्योगांना फायदा तीन महिन्यांपूर्वीच सरकारने बरेचसे इन्सेंटिव्ह उद्योगांना दिलेले आहेत. आजच्या अर्थसंकल्पात निर्यातीसंबंधी चांगली तरतूद ...

कस्टम ड्यूटी वाढविल्यामुळे लघु उद्योगांना फायदा
कस्टम ड्यूटी वाढविल्यामुळे लघु उद्योगांना फायदा
तीन महिन्यांपूर्वीच सरकारने बरेचसे इन्सेंटिव्ह उद्योगांना दिलेले आहेत. आजच्या अर्थसंकल्पात निर्यातीसंबंधी चांगली तरतूद असेल, असे आम्हाला वाटले होते. त्यानुसार कस्टम ड्यूटी वाढविल्यामुळे लघु उद्योगांना चांगला फायदा होईल. याशिवाय संशोधन आणि विकास क्षेत्रावर ५० हजार कोटींचा सपोर्ट दिला आहे. त्याचा सुद्धा लघु उद्योगांना फायदा होणार आहे. ऑटोमोबाइल स्क्रॅपिंग पॉलिसी आणली आहे. त्यामुळे ऑटोमोबाइल उद्योगांना मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे स्थलांतरित कामगारांचे योगदान औरंगाबादच्या उद्योगांसाठी आहे. स्थलांतरित कामगारांसाठी ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ हे चांगले धोरण स्वीकारले आहे. त्यांना सुविधा झाली, तर सहजच उद्योगांत कुशल कामगार टिकून राहतील. नाशिक शहरासाठी ‘मेट्रो रेल्वे’ची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याप्रमाणे औरंगाबादसाठीही घोषणा झाली असती, तर विकासाच्या दृष्टीने मोठा कायापालट झाला असता.
- कमलेश धूत, अध्यक्ष, ‘सीएमआयए’