निधीविना कामाची गती मंद
By Admin | Updated: July 17, 2017 00:59 IST2017-07-17T00:57:39+5:302017-07-17T00:59:46+5:30
औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाने महानुभाव आश्रम ते लिंक रोडपर्यंत या २ कि़मी. कामाला सुरुवात केली असली तरी त्या कामाला पैशांविना गती मिळत नसल्याने ते काम ठप्प आहे

निधीविना कामाची गती मंद
विकास राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाने महानुभाव आश्रम ते लिंक रोडपर्यंत या २ कि़मी. कामाला सुरुवात केली असली तरी त्या कामाला पैशांविना गती मिळत नसल्याने ते काम ठप्प पडल्यासारखे झाले आहे. परिणामी, जीव मुठीत धरून एकतर्फी मार्गाने वाहनधारकांना ये-जा करावी लागत आहे.
विशेष म्हणजे कोर्टाने या २ कि़मी.च्या अंतरातील कामासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश सा.बां. खात्याला दिलेले आहेत. असे असताना काम सुरू होऊन दीड महिना उलटला तरीही बांधकाम खात्याने अनुदानाची तरतूद केलेली नाही. सचिवांपर्यंत या कामाची नव्याने फाइल सादर करण्याची वेळ सर्कल आॅफिसवर आली आहे. यावरून हा विभाग किती सक्षम आणि पारदर्शक काम करीत आहे, याचा अंदाज येतो.