हलगर्जीपणा भोवला; ग्रामसेवक निलंबित
By Admin | Updated: April 6, 2017 23:15 IST2017-04-06T23:12:01+5:302017-04-06T23:15:24+5:30
बीड : गेवराई पंचायत समिती अंतर्गत कार्यरत ग्रामसेवक व्ही.डी. कौलुके यांना कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून गुरुवारी निलंबित करण्यात आले.

हलगर्जीपणा भोवला; ग्रामसेवक निलंबित
बीड : गेवराई पंचायत समिती अंतर्गत कार्यरत ग्रामसेवक व्ही.डी. कौलुके यांना कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून गुरुवारी निलंबित करण्यात आले.
ग्रामपंचायतचा लेखा परीक्षण अहवाल सादर न करणे, मासिक बैठकीला विनापरवानगी गैरहजर राहणे, भांडवली मूल्यावर कर आकारणी न करणे, ग्रामपंचायतीचा प्रगती अहवाल न पाठविणे, लोकसेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीची माहिती न कळविणे, अशा विविध कारणांवरून त्यांच्या बाबतीत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे यांनी यासंदर्भात सीईओंना अहवाल पाठविला. त्यानुसार सीईओ नामदेव ननावरे यांनी कौलुके यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला. (वार्ताहर)