लोकप्रतिनिधींच्या घरासमोर झोपमोड आंदोलन
By Admin | Updated: November 16, 2015 00:39 IST2015-11-15T23:50:53+5:302015-11-16T00:39:17+5:30
लातूर : महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी रविवारी रात्री उशिरा लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आ़विक्रम काळे यांच्या नेतृत्वाखाली ‘झोपमोड आंदोलन’ करण्यात आले़

लोकप्रतिनिधींच्या घरासमोर झोपमोड आंदोलन
लातूर : महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी रविवारी रात्री उशिरा लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आ़विक्रम काळे यांच्या नेतृत्वाखाली ‘झोपमोड आंदोलन’ करण्यात आले़ आ़अमित देशमुख, आ़ त्रिंबक भिसे, आ़ संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरासमोर हे आंदोलन झाले़ यावेळी विविध मागण्यांचे निवेदनही लोकप्रतिनिधींना देण्यात आले़
२५ आॅगस्ट २०१५ च्या संच मान्यतेचा निर्णय रद्द करणे, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा अहवाल मान्य करणे, खाजगी शिक्षण संस्थांची स्वायत्तता कायम ठेवणे, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत असलेले व त्यानंतर सेवेत आलेल्या सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, प्राथमिक शाळांमध्ये लिपीक व सेवकांची पदे मान्य करण्यात यावी, शालेय पोषण आहार यंत्रणा स्वतंत्र राबविण्यात यावी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळाबाह्य कामे देण्यात येवू नयेत, अनुदानास पात्र असलेल्या शाळांना अनुदान देण्यात यावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या़ आंदोलनकर्त्यांनी आमदार अमित देशमुख, आ. त्रिंबक भिसे, माजी खा. रुपाताई पाटील निलंगेकर यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
आंदोलनात रामदास पवार, वसंतराव पाटील, प्राचार्य डी़एऩ केंद्रे, कालिदास माने, प्राग़ोविंद घार, जे़जी़ सगरे, प्राचार्य बाबुराव जाधव, प्रभाकर बंडगर, पांडुरंग देडे, अण्णाराव शिंदे, पांडुरंग चिंचोलकर, प्रा़ओमप्रकाश साकोळकर, कमलाकर शिंदे, एस़जी़ लखनगावे, गणपत बाजुळगे, एच.एम. कोनाळीकर, विशाल पाखरे, एम.एस. कदम आदींचा समावेश होता़