आरोग्य विभाग झोपलेले

By Admin | Updated: August 26, 2014 00:39 IST2014-08-26T00:39:56+5:302014-08-26T00:39:56+5:30

तामसा : तामसा व परिसरात नागरिकांना विषमज्वराच्या तापाने चांगलेच घेरले़ या आजाराबद्दल आरोग्य विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत आहे़ कारण तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात

Sleeping in the health department | आरोग्य विभाग झोपलेले

आरोग्य विभाग झोपलेले


तामसा : तामसा व परिसरात नागरिकांना विषमज्वराच्या तापाने चांगलेच घेरले़ या आजाराबद्दल आरोग्य विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत आहे़ कारण तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच वैद्यकीय अधिकारी आहे़ तर वायफना प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने रुग्णांचे बेहाल होत आहेत़
तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास ४० ते ४५ हजार लोकसंख्या असून वायफना आरोग्य केंद्रातही तेवढीच लोकसंख्या आहे़ या रुग्णांच्या दिमतीला सध्या तरी एकच वैद्यकीय अधिकारी आहे़ नुकतीच एका वैद्यकीय अधिकाऱ्याची ३१ जुलै रोजी सेवानिवृत्ती झाली़ त्यानंतर आरोग्य प्रशासनाने या ठिकाणी नव्याने नियुक्ती केली नसल्याचे दिसून येत आहे़ तसेच वायफना आरोग्य केंद्रातील सुद्धा तीच परिस्थिती असून येथील वैद्यकीय अधिकारी मुनेश्वर येथील चंद्रपूर येथे बदली झाली आहे़ तर पूर्वीचे वैद्यकीय अधिकारी राम मुसांडे सध्या कार्यरत आहेत़ तर वायफना आरोग्य केंद्रात एका महिला डॉक्टरची नियुक्ती झाली़ पण त्या अद्याप हजर झाल्या नसल्याचे समजले़ तामसा व वायफना आरोग्य केंद्रात प्रत्येकी एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने नागरिकांचे आरोग्य सांभाळण्याऐवजी त्यांना बैठका, मिटींग असेच कामे सुधरत नसल्याने त्यांना नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही़
नागरिकांचे आरोग्य सांभाळायचे असेल तर आरोग्य विभागाने तामसा व वायफनायेथे एक आरोग्य अधिकारी व एक महिला आरोग्य अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची गरज आहे़ तसेच या दोन्ही केंद्रास औषधीसाठाही देण्याची मागणी होत आहे़ वायफना आक़ेंद्रात तामसा प्रा़आ़ केंद्राच्या जवळ असणारी काही गावे जोडण्यात आल्याने नागरिकांना वेळेवर औषधोपचार मिळत नाही़ त्यामुळे किंवा डॉक्टर वेळेवरउ उपलब्ध होत नाही़ रात्री-बेरात्री एखादा गंभीर आजाराने त्रस्त रुग्णास वायफना आरोग्य केंद्रास जोडलेल्या वडगाव बु़, नाव्हा, रावणगाव, दिग्रस, लोहा, पिंपराळा, एकराळा येथील नागरिकांना गैरसोयीचे होत आहे़(वार्ताहर)

तामसा व परिसरात विषमज्वराच्या तापाने नागरिक फणफणत असून सराकरी दवाखान्यात औषधी व एखादवेळी डॉक्टर मिटींगला गेले तर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना खाजगी दवाखान्याचा आसरा घ्यावा लागतो़ त्यामुळे नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे़ अगोदरच दुष्काळाच्या संकटात सापडलेली जनता विषमज्वर, खोकला, सर्दी, पडसे अशा आजाराने त्रस्त असली तरी आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत आहे़ मच्छरांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली असून आरोग्य विभागाकडून फवारणी करण्याची गरज आहे़

Web Title: Sleeping in the health department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.