‘एसटी’च्या ताफ्यामध्ये लवकरच स्लीपर बसेस

By Admin | Updated: July 7, 2016 23:55 IST2016-07-07T23:49:04+5:302016-07-07T23:55:54+5:30

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच स्लीपर बसेसचा समावेश होणार आहे. त्यासाठी महामंडळाकडून जोरदार तयारी सुरू आहे.

Sleeper buses soon in 'ST' tram | ‘एसटी’च्या ताफ्यामध्ये लवकरच स्लीपर बसेस

‘एसटी’च्या ताफ्यामध्ये लवकरच स्लीपर बसेस

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच स्लीपर बसेसचा समावेश होणार आहे. त्यासाठी महामंडळाकडून जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात ‘एसटी’ प्रवाशांना प्रवास अधिक आरामदायक होणार आहे.
गेल्या काही वर्षात ‘एसटी’ला खाजगी बससेवेशी स्पर्धा करावी लागत आहे. त्यामुळे ‘एसटी’ने काळानुरूप बदल करीत खाजगी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी नवनवीन उपाययोजना करीत आहे. बसगाड्यांमधील मागे-पुढे होणारी आसन व्यवस्था आणि त्यावर प्रवाशांना झोप काढता येण्याची सुविधा म्हटली की, केवळ खासगी बसगाड्याच नजरेसमोर येत होत्या; परंतु अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुशबॅक आसन व्यवस्था राहणाऱ्या एशियाड बसेसची बांधणी करण्यात आली.
एकट्या औरंगाबादेतील चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत टप्प्याटप्प्याने २३७ एशियाड बसगाड्या बांधण्यात आल्या. त्यामुळे आता खाजगी आणि एस.टी. महामंडळाच्या शिवनेरी बसगाड्यांप्रमाणेच एशियाड बसेसचा प्रवास अधिक आरामदायक होत आहे. यानंतर साध्या बसची आसन व्यवस्थाही अधिक आरामदायक करण्यात आली आहे.
आता महामंडळाने यापुढेही पाऊल टाकले आहे. महामंडळाच्या ताफ्यात स्लीपर बसेसचा समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू क रण्यात आले आहेत. एस. टी. महामंडळाने पुरविलेल्या चेसीसवर बसेसच्या बांधणीसाठी सध्या निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यातून काही बसेसची बांधणी केली जाणार आहे. यामध्ये सेमी लक्झरीबरोबर स्लीपर बसचा समावेश राहणार आहे. एस.टी.महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी यास दुजोरा दिला.
पुणे मार्गासाठी दोन स्कॅनिया
आजघडीला पुणे मार्गावर शिवनेरी बससेवा सुरू आहे. यामध्ये दोन बसेस या औरंगाबाद विभागाच्या आहेत. आता या मार्गासाठी लवकरच दोन स्कॅनिया बसेस दाखल होणार आहेत.
अत्याधुनिक असलेल्या या बसेस आॅटोमॅटिक गेअर असलेल्या आहेत.

Web Title: Sleeper buses soon in 'ST' tram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.