आकाश घोडेला १ सप्टेंबरपर्यंत कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:15 IST2017-08-31T00:15:35+5:302017-08-31T00:15:35+5:30

गोविंद गगराणी खून प्रकरणातील दुसरा आरोपी आकाश अशोक घोडे उर्फ गोट्याया (१९, रा. अंबड) यास पोलिसांनी बुधवारी दुपारी अंबड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

The sky stallion until September 1 | आकाश घोडेला १ सप्टेंबरपर्यंत कोठडी

आकाश घोडेला १ सप्टेंबरपर्यंत कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : गोविंद गगराणी खून प्रकरणातील दुसरा आरोपी आकाश अशोक घोडे उर्फ गोट्याया (१९, रा. अंबड) यास पोलिसांनी बुधवारी दुपारी अंबड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
आकाश घोडे, नाथसागर जाधव उर्फ तुक्या व अरुण कानिफनाथ मोरे या तिघांवर रविवारी रात्री गोविंद गगराणी (१९) याचा शहरातील आयटीआय इमारती मागील शासकीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर खुन करुन मृतदेह शेजारील खदानीत टाकल्याचा आरोप आहे. सोमवारी सकाळी गोविंदचा मृतदेह सापडल्यानंतर तालुक्यासह संपूर्ण जिल्हयात एकच खळबळ उडाली होती.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी दुपारीच गोविंद याचा मित्र नाथसागर जाधव उर्फ तुक्या याला ताब्यात घेतले. त्याला खाकीचा हिसका दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली देत अन्य दोन साथीदारांची नावे सांगितली.
सोमवारी नाथसागर जाधव याला अंबड न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर सोमवारी सायंकाळी अटक करण्यात आलेल्या आकाशला आज तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी अरुण कानिफनाथ जाधव अद्यापही फरार असून त्याच्या अटकेनंतरच खुनाचे रहस्य उलगडण्याची शक्यता आहे.

Web Title: The sky stallion until September 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.