सहाशेवर शाळांची झाडाझडती
By Admin | Updated: January 14, 2017 00:22 IST2017-01-14T00:20:47+5:302017-01-14T00:22:15+5:30
बीड : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत गुणवत्तेची नेमकी स्थिती काय आहे? हे पाहण्यासाठी शुक्रवारी १६४ पथकांतर्फे ६५६ शाळांमध्ये झाडाझडती घेण्यात आली.

सहाशेवर शाळांची झाडाझडती
बीड : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत गुणवत्तेची नेमकी स्थिती काय आहे? हे पाहण्यासाठी शुक्रवारी १६४ पथकांतर्फे ६५६ शाळांमध्ये झाडाझडती घेण्यात आली. शनिवारी सीईओंना तपासणी अहवाल सादर केला जाणार आहे.
शिक्षण आयुक्त नंदकुमार यांनी जिल्ह्यातील गुणवत्तेच्या अनुषंगाने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे सीईओ नामदेव ननावरे यांनी गुणवत्ता तपासणीसोबतच शालेय पोषण आहार, भौतिक सुविधांची माहिती जाणून घेण्यासाठी १६४ पथके नेमली होती. विस्तार अधिकारी, केंद्रीय मुख्याध्यापक, मुख्याध्यापक यांचा यात समावेश होता. द्वि-सदस्यीय पथकांनी प्रत्येकी चार शाळा तपासल्या. त्यासाठी तालुकानिहाय समन्वयक नेमले होते. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमात दिलेल्या २५ निकषांच्या अनुषंगाने शाळांनी नेमक्या काय सुधारणा केल्या, याची पाहणी करून विशिष्ट प्रपत्रात नोंद करण्यात आली आहे. या तपासणीमुळे अनेक शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. अहवालाकडे लक्ष आहे. (प्रतिनिधी)