शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात सोळा संगणक, पाच बॅटऱ्यांवर चोरांचा डल्ला

By admin | Updated: July 30, 2014 00:49 IST

कोळगाव : गेवराई तालुक्यातील मादळमोही, चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संगणक चोरांची टोळी सक्रीय झाली आहे.

कोळगाव : गेवराई तालुक्यातील मादळमोही, चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संगणक चोरांची टोळी सक्रीय झाली आहे. गेल्या काही दिवसात मादळमोही येथील व कोळगाव येथीलही शाळेतील संगणक, बॅटरी व अ‍ॅम्प्लीफायरवर चोरांनी डल्ला मारला आहे. गेल्या काही दिवसात मादळमोही व चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत. ग्रामस्थांची नजर चुकवून घरातील छोट्या- मोठ्या वस्तू चोरटे पसार करू लागले आहेत. असे असले तरी चोरट्यांची मजल आता वाढल्याचे दिसून येत आहे. महिनाभरापूर्वी मादळमोही येथील मोहीमाता विद्यालयातील बारा संगणक व अन्य साहित्य चोरट्यांनी लंपास केले होते. या घटनेतील आरोपींचा तपास लागत नाही तोच पुन्हा चोरट्यांनी कोळगाव येथील शाळेतही चोरी करून पोलीसांना आव्हान दिले आहे. कोळगाव येथील नुतन कोळेश्वर विद्यालयाचे रविवारी रात्री चोरट्यांनी कुलूप तोडून चार संगणक, इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्या व एम्प्लिफायर चोरून नेले आहे. याबाबत चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चोरट्यांनी आपला मोर्चा आता शाळांकडे वळविल्याचे या भागात दिसून येत आहे. त्यामुळे चोरट्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी मादळमोही, कोळगावसह परिसरातील नागरिकांतून केली जात आहे. (वार्ताहर)