वीज कडाडली अ्न् सहा वर्षाच्या चिमुकलीचा घाबरून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:02 IST2021-06-09T04:02:56+5:302021-06-09T04:02:56+5:30

अक्सा इस्माईल शेख (रा. तक्षशिलानगर) असे मृत बालिकेचे नाव आहे. अक्साचे वडील इस्माईल शेख मजुरी करतात. रविवार असल्याने शेख ...

Six-year-old Chimukali dies of shock | वीज कडाडली अ्न् सहा वर्षाच्या चिमुकलीचा घाबरून मृत्यू

वीज कडाडली अ्न् सहा वर्षाच्या चिमुकलीचा घाबरून मृत्यू

अक्सा इस्माईल शेख (रा. तक्षशिलानगर) असे मृत बालिकेचे नाव आहे. अक्साचे वडील इस्माईल शेख मजुरी करतात. रविवार असल्याने शेख यांचे संपूर्ण कुटुंब घरीच होते. सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास धो धो पाऊस पडत असताना अक्सा दारात उभी राहून पाऊस पाहात आणि घरातील मंडळीला बोलत होती. यावेळी अचानक मोठ्या आवाजात वीज कडाडली. या आवाजाने अक्सा घाबरून बेशुद्ध पडली. नातेवाईकानी तिला घाटी रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर वॉर्ड क्रमांक २५ मध्ये उपचार सुरू असताना रात्री ९:३० वाजेच्या सुमारास अक्साचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची जिन्सी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सोमवारी दुपारी शवविच्छेदन झाले. तिच्या मृत्यूचे कारण राखीव ठेवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतल्याचे पोलीस हवालदार पानकडे यांनी सांगितले.

Web Title: Six-year-old Chimukali dies of shock