सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त

By Admin | Updated: October 14, 2014 00:40 IST2014-10-14T00:26:09+5:302014-10-14T00:40:00+5:30

औरंगाबाद : पोलिसांच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे.

Six thousand police managements | सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त

सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त

औरंगाबाद : पोलिसांच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात तीनशे पोलीस अधिकाऱ्यांसह सहा हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. शिवाय, राज्य राखीव पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या तब्बल १२ कंपन्याही तैनात असणार आहेत.
१५ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त असणार आहे. औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अडीच हजार पोलीस, चारशे होमगार्ड, तीनशे महिला पोलीस, पावणेदोनशे अधिकारी असा एकूण ३,३९५ पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. त्याशिवाय शहराच्या हद्दीत सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफच्या ४ कंपन्या दाखल झाल्या आहेत. प्रत्येक कंपनीत सरासरी ९० जवान आहेत.
औरंगाबाद शहर वगळता उर्वरित जिल्ह्यात पोलीस अधीक्षक कार्यालयाने पोलीस बंदोबस्ताचा आराखडा तयार केला असून त्यानुसार जिल्ह्यात दोन हजार पोलीस, आठशे होमगार्ड आणि ३० पोलीस अधिकारी असा एकूण २८०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे, तसेच जिल्ह्यात बीएसएफ, सीआरपीएफ, एसआरपीच्या ८ कंपन्याही असणार आहेत.
पोलिसांची दीडशे पथके फिरतीवर
मतदानाच्या दिवशी ग्रामीण भागात पोलिसांची १५० वाहने फिरतीवर असणार आहेत. प्रत्येक वाहनात दहा ते पंधरा शस्त्रधारी पोलीस कर्मचारी असतील. कुठे गडबड, गोंधळ झाल्याची माहिती मिळताच दहा मिनिटांत हे पथक तेथे दाखल होईल.
पोलिसांची चोख सज्जता
01
पोलीस आयुक्त
08
पोलीस उपाधीक्षक
237
सहायक निरीक्षक
03
पोलीस उपायुक्त
07
सहायक आयुक्त
4675
पोलीस कर्मचारी
03
पोलीस अधीक्षक
58
पोलीस निरीक्षक
1167
होमगार्ड

Web Title: Six thousand police managements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.