शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

हॉटेल ग्रँड सरोवर आगीत दोन मजले खाक; वेळीच विद्युत पुरवठा बंद केल्याने मोठा अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 17:08 IST

फॉरेन्सिक, विद्युत निरीक्षक, पोलिस प्रशासनाने घटनास्थळी भेट देत पाहणी करून पंचनामा केला.

वाळूजमहानगर : सोलापूर-धुळे महामार्गावर तीसगाव येथे असलेल्या आ. प्रदीप जैस्वाल यांच्या हॉटेल ग्रँड सरोवरच्या समोरील भागाला गुरुवार १० एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत किचन, स्टोअररूमसह सहा रूम्सचे नुकसान झाले आहे. सुदैवाने आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, शुक्रवारी फॉरेन्सिक, विद्युत निरीक्षक, पोलिस प्रशासनाने घटनास्थळी भेट देत पाहणी करून पंचनामा केला.

आगीत किचनमधील सर्व साहित्य, इलेक्ट्रिक उपकरणांचे नुकसान झाले. पहिल्या मजल्यावरील परमीट रूममधील सर्व वस्तू आगीच्या लपेट्यात आल्या. तसेच दुसऱ्या मजल्यावर असलेल्या स्टोअर रूममधील गाद्या, उशा, सोफे व इतर साहित्य जळाले. तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या मजल्यावरील काही रूममधील बेड, खिडकीच्या काचा, फॅन, एलीडी, सोफा व इतर साहित्याला आगीची झळ बसली. हॉटेलचे कर्मचारी अनिल पवार यांना आग लागल्याचे दिसताच त्यांनी विद्युत पुरवठा बंद केल्याने मोठा अनर्थ टळला.

हॉटेलच्या बाहेरील १६ एसी कॉम्प्रेसर जळाले. २२ खिडक्यांच्या काचा फुटल्या. दुसऱ्या मजल्यावर बाल्कनीतील फायबर शेड्स, हॉटेलच्या उजव्या बाजूला बाहेरून ॲल्युमिनियम पत्र्याचे लेअर वितळले. या हॉटेलमध्ये एकूण ४० कामगार असून आग लागली, त्यावेळी हॉटेलमध्ये चार ते पाच ग्राहक होते. आग लागताच हॉटेलमधील सर्व कामगार व ग्राहकांना बाहेर काढल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. फॉरेन्सिक विभागाचे दिलीप परदेशी, दौलताबाद युनिट विद्युत शाखेचे शेख, वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे, पोलिस उपनिरीक्षक रावसाहेब काकड, बाळासाहेब आंधळे आदींनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. शिंदे यांच्याकडे घटनेचा तपास आहे.

महिन्याभरात पूर्ववत होईलकालच्या आगीच्या घटनेत हॉटेलचे व्हेंटिलेशन एरियाचे नुकसान झाले आहे. एकूण हॉटेलच्या परिसराचा विचार केला तर हे नुकसान जास्त नाही. या आगीच्या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही, हे महत्त्वाचे आहे. जे काही नुकसान झाले आहे, ते तातडीने दुरुस्त करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. हॉटेलचा कुठलाही विमा काढलेला नव्हता. महिन्याभरात हॉटेल पूर्ववत व्हावे, यासाठी शुक्रवारपासून लगेच काम सुरू केले आहे.- ऋषिकेश जैस्वाल, हॉटेल मालक.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरPradeep Jaiswalप्रदीप जैस्वालhotelहॉटेलFire Brigadeअग्निशमन दल