दारू घेऊन जाणाऱ्या सहा जणांना अटक

By Admin | Updated: August 31, 2014 00:11 IST2014-08-30T23:41:22+5:302014-08-31T00:11:29+5:30

परभणी : दारू घेऊन जाणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी अटक करून १४ हजार ७७१ रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे़

Six people who take alcohol are arrested | दारू घेऊन जाणाऱ्या सहा जणांना अटक

दारू घेऊन जाणाऱ्या सहा जणांना अटक

परभणी : बेकायदेशीररित्या चोरटी दारू घेऊन जाणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी अटक करून १४ हजार ७७१ रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे़
पोलिस अधीक्षक अनंत रोकडे यांच्या आदेशावरून अवैध धंदे, मटका व बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे़ या आदेशावरून जिल्ह्यातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत धाडसत्र सुरू केले आहे़ यामध्ये बेकायदेशीररित्या दारू घेऊन जाणाऱ्या नजमा अब्दुल्ला खान पठाण, सुरेश लक्ष्मण धायडे, लक्ष्मण अच्युत गायकवाड (सर्व रा़ परभणी), बबन बाबुराव काळंगिरे (रा़ राणीसावरगाव), विनोद आनंदराव कोटलवार (रा़पूर्णा), नितीन मरोबा सितारे (रा़ पोखर्णी नृसिंह) या सहा जणांना पोलिसांनी रंगेहात पडकले असून, त्यांच्याकडून २६६ बॉटल जप्त करण्यात आल्या असून, ज्याची किंमत अंदाजे १४ हजार ७७१ रुपये एवढी आहे़ या प्रकरणी विविध पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Six people who take alcohol are arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.