शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

कारागृहात मैत्री झालेले सहा कुख्यात गुन्हेगार आले एकत्र अन् ठरला उद्योजक लड्डा दरोड्याचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 20:06 IST

लड्डा विदेशात जाताच १० मे पासून ठरले नियोजन, १३ व १४ मे रोजी केली रेकी, १५ मे रोजी लॉजवर दारू पिऊन टाकला दरोडा

छत्रपती संभाजीनगर : उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात मोठ्या प्रमाणात रोख असते, अशी माहिती वाळूजमधीलच एका व्यक्तीकडून आरोपी योगेश सुभाष हाजबेला (३१, रा. वडगाव कोल्हाटी) मिळाली होती. त्याने ही बाब अमोल बाबुराव खोतकर (३४, रा. पडेगाव) याला सांगितल्यानंतर त्यांनी ही रोख लुटण्याचे ठरवले. तेव्हापासून हाजबे सातत्याने लड्डा यांची माहिती मिळवत होता. ते अमेरिकेत जाताच हाजबेने अमोलसोबत मिळून दरोड्याच्या सहा दिवसांपूर्वी नियोजन केले. अमोलने कारागृहात मैत्री झालेल्या अंबाजोगाईच्या कुख्यात गुन्हेगारांना शहरात बोलावून नियोजनबद्ध कट रचून १५ मे रोजी लॉजवर येथेच्छ दारू रिचवून दरोडा टाकला.

एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावरील उच्चभ्रू वसाहतीत १५ मे रोजी हा धाडसी दरोडा पडला. लड्डा यांची वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये ‘दिशा ऑटो कॉम्प्स’ कंपनी आहे. ७ मे रोजी ते पत्नी, मोठ्या मुलासह अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या मुलाच्या पदवीदान समारंभासाठी गेले होते. यादरम्यान १९ वर्षांपासून चालक असलेले संजय झळके घराची देखभाल करून तेथेच झोपत होते. १५ मे रोजी मध्यरात्री २ वाजता कारमधून आलेले दरोडेखोर सुरक्षा भिंतीवरून उड्या मारत बंगल्यात घुसले. तेथीलच शिडीने पहिल्या मजल्यावर जात दरवाजा तोडून घरात घुसले. झळके यांना मारहाण करून हात व तोंड बांधत छातीवर गावठी पिस्तूल रोखून लूट केली.

असा रचला गेला कट, अभ्यासपूर्ण रेकी व नियोजन-हाजबेला लड्डा यांच्या विषयी सर्व माहिती होती. लड्डा यांच्या घरात मोठी राेख असल्याचे त्याने अमोलला सांगितल्यानंतर दरोड्याचा कट ठरला.-हाजबे सातत्याने लड्डा यांच्यावर पाळत ठेऊन होता. ते अमेरिकेत गेल्याचे कळताच ९ मे पासून दोघांनी त्यांच्या सोसायटीत फिरणे सुरू केले. १० मे रोजी दरोड्याचे निश्चित केले. ११ मे रोजी अमाेलने आंबेजोगाईचा कुख्यात दरोडेखोर सुरेश उर्फ सूर्यकांत गंगणे (४५), सोहेल जलील शेख (२२) यांना शहरात बोलावले. हाजबेने साजापूरचा मित्र महेंद्र माधव बिडवे (३८) याला सहभागी केले.-गंगणे सोहेलला घेऊन शहरात आला. १३ व १४ मे रोजी त्यांनी रेकी करून पुढील २४ तासांत त्यांनी दरोड्याचा अंमल केला. या सर्वांची कारागृहात घट्ट मैत्री झाली होती.

यांनी रचला दरोड्याचा कट, अमोलचा मृत्यू, पाच अटकेत- मृत अमोल बाबूराव खोतकर (३४, रा. पडेगाव)- याेगेश सुभाष हाजबे (३१, रा. वडगाव कोल्हाटी)- सय्यद अजहरोद्दीन सय्यद कबीरोद्दीन (३७, रा. रांजणगाव शेणपुंजी)- महेंद्र माधव बिडवे (३८, रा. साजापूर)- सुरेश उर्फ सूर्यकांत रामकिसन गंगणे (४५, रा. अंबाजोगाई)- सोहेल जलील शेख (२२, रा. अंबाजोगाई)

गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी, अमोल मांस खाणाऱ्या बबल्याचा मित्रअमोल खोतकर : छावणी, एम. सिडको, बेगमपुरा, खुलताबाद, सातारा, बदनापूर, अहिल्यानगर, वेदांतनगर पोलिस ठाण्यात चोरी, दरोडा, लूटमार, मारहाण, हत्येचा प्रयत्न, अवैध दारू विक्री, फसवणुकीचे १० गुन्हे दाखल आहेत. २ जून रोजी त्याची फसवणुकीच्या गुन्ह्यात न्यायालयात सुनावणी होती. २०१० मध्ये गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल ठेवलेल्या अमोलवर २०२२ मध्ये वेदांतनगर ठाण्यात शेवटचा गुन्हा दाखल झाला होता.-२६ सप्टेंबर, २०१८ रोजी त्याने गुन्हे शाखेचे तत्कालीन अधिकारी मारोती दासरे व त्यांच्या पथकावर जैन इंटरनॅशनल स्कूलजवळ अशाचप्रकारे कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करून पसार झाला होता. हत्येनंतर मृताचे मांस खाण्यासाठी कुख्यात गुन्हेगार शेख वाजिद बबलाचा अमोल मित्र होता. २०१५ मध्ये दोघांनी मिळून एक गुन्हा केला होता.

सुरेश गंगणे : एकूण ११ गुन्ह्यांपैकी सर्वाधिक ९ गुन्हे सुरेशवर एकट्या आंबेजोगाई पोलिस ठाण्यात दाखल आहेत. चोरी, दरोडा, लूटमार, अपहरण यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. ६ वर्षे तो मोक्का अतंर्गत कारागृहात होता. काही महिन्यांपूर्वीच जामिनावर सुटला आहे. २०१८ दरम्यान कारागृहात अमोल व त्याची मैत्री झाली.

योगेश हाजबे : योगेशवर सर्वाधिक ५ गुन्हे एम. वाळूज पोलिस ठाण्यात आहेत. यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, हत्येचा प्रयत्न, अवैध दारूविक्रीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. २०१४ मध्ये त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर