सहा जुगाऱ्यांवर कारवाई; १५ लाखांचा ऐवज जप्त
By Admin | Updated: May 20, 2015 00:18 IST2015-05-20T00:12:47+5:302015-05-20T00:18:12+5:30
उस्मानाबाद : तालुक्यातील आळणी पाटीजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या सहा जणांविरूध्द विशेष पथकाने कारवाई केली़

सहा जुगाऱ्यांवर कारवाई; १५ लाखांचा ऐवज जप्त
उस्मानाबाद : तालुक्यातील आळणी पाटीजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या सहा जणांविरूध्द विशेष पथकाने कारवाई केली़ या कारवाईत तब्बल १५ लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ ही कारवाई मंगळवारी दुपारच्या सुमारास करण्यात आली असून, या प्रकरणी उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
पोलिसांनी सांगितले की, आळणी पाटीजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये पैशावर तिरट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती विशेष पोलीस पथकाचे पोउपनि विशाल शहाणे यांना मिळाली होती़ या माहितीनंतर पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली शहाणे यांच्यासह पोहेकॉ दिलीप पवार, पोना मनोज कंकाळ, पोकॉ सुरज पांचाळ, पोकॉ गणेश गुरव, पोकॉ विशाल सगर, पोकॉ सचिन मुस्तापुरे यांच्या पथकाने आळणी फाट्याजवळील पत्र्याच्या शेडवर छापा मारला़ यावेळी त्यावेळी संदीप दामोदर गरड (वय-३० रा़बार्शीनाका उस्मानाबाद), जयंत शहाजी भोसले (वय- ३२ रा़येडशी), विक्रम महादेव गरड (वय-३० राख़ेड), सतीश ज्ञानोबा बन (वय- ३८ रा़ तेर), सुनिल भगवान वाघमारे (ंवय-२८ रा़येडशी), शकील फरीद तांबोळी (वय-३५ रा़ढोकी) या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले़ त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला़ याप्रकरणी उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ विशेष पथकाच्या या धाडसी कारवाईमुळे जुगाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़