रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना सहा कोटींचे अनुदान

By Admin | Updated: May 16, 2016 23:44 IST2016-05-16T23:40:03+5:302016-05-16T23:44:16+5:30

बाळासाहेब जाधव ल्ल लातूर रेशीम उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत सामुहिक शेतीच्या माध्यमातून रेशीम उत्पादन घेण्याचा उपक्रम शासनाने हाती घेतला आहे़

Six crores grants to the farmers of silk producers | रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना सहा कोटींचे अनुदान

रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना सहा कोटींचे अनुदान

अनुदानाबरोबर रोजगार : जिल्ह्यातील ९ गावांत २५० हेक्टरवर होणार लागवड...
बाळासाहेब जाधव ल्ल लातूर
रेशीम उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत सामुहिक शेतीच्या माध्यमातून रेशीम उत्पादन घेण्याचा उपक्रम शासनाने हाती घेतला आहे़ त्यासाठी तुती लागवडीसाठी लातूर जिल्ह्यातील ९ गावांची निवड केली आहे़ या उपक्रमात रेशीम उत्पादकांना अनुदानाबरोबरच रोजगारही मिळणार आहे़ या ९ गावात २५० हेक्टर लागवडीसाठी ६ कोटी ७० लाख रुपये अनुदान मिळणार आहे़
शेतकऱ्यांना किफायतशीर उत्पादन मिळून गावातच रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून रेशीम उत्पादनासाठी समूह शेतीचा उपक्रम हाती घेतला आहे़ ५ एकरपर्यंत शेती असलेल्या २५ ते ३० शेतकऱ्यांचा गट केला जाणार आहे़ या उपक्रमात पहिल्या टप्प्यात रेणापूर तालुक्यातील खरोळा, औसा तालुक्यातील आलमला, चाकूर तालुक्यातील नळेगाव, आष्टा, उदगीर तालुक्यातील वाढवणा, अहमदपूर तालुक्यातील मुळकी, लातूर तालुक्यातील आखरवाई, मसला, मुरुड आदी ९ गावांची निवड केली आहे़ केंद्र शासनाच्या रेशीम कार्यालयाअंतर्गत रोजगार हमी योजनेशी ही योजना संलग्न करण्यात आली आहे़
निवडलेल्या या ९ गावातील २९९ शेतकऱ्यांच्या शेतीचा सर्व्हे करून २५० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे़ या रेशीम उत्पादक लाभार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे़ या शेतकऱ्यांच्या प्रस्तावाला रोजगार हमी योजनेची मंजूरीही मिळाली आहे़ आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मंजूरीनंतर तुती लागवडीला प्रारंभ होणार आहे़ या उपक्रमात प्रती हेक्टर वर्षाला २ लाख ६८ हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे़ या अनुदानाबरोबरच ५४ हजार १४४ रुपयांची मजुरीही मिळणार आहे़
रेशीम, तुती लागवडीच्या माध्यमातून उत्पादक शेतकऱ्यांचा चांगला फायदा होणार आहे़ तुती लागवड केल्यास आंतरपीकही घेता येईल़ आंतरपीक आणि तुती लागवड असे दुहेरी उत्पन्न घेता येत असल्याने लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा आहे.

Web Title: Six crores grants to the farmers of silk producers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.