सहा कोटींचा निधी परत

By Admin | Updated: July 26, 2014 01:10 IST2014-07-26T00:53:12+5:302014-07-26T01:10:26+5:30

सुनील कच्छवे, औरंगाबाद मागील आर्थिक वर्षात जिल्ह्यातील आमदारांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीपैकी ६७ टक्केच निधी विकास कामांवर खर्च केला आहे.

Six crore funds back | सहा कोटींचा निधी परत

सहा कोटींचा निधी परत

सुनील कच्छवे, औरंगाबाद
मागील आर्थिक वर्षात जिल्ह्यातील आमदारांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीपैकी ६७ टक्केच निधी विकास कामांवर खर्च केला आहे. उर्वरित ३३ टक्के म्हणजे सुमारे सहा कोटी रुपयांचा निधी शासनाकडे परत गेला आहे. जिल्ह्यात पैठणचे आ. संजय वाघचौरे यांनी दोन कोटींपैकी केवळ ७० लाख रुपयेच खर्च केले आहेत. तर आर. एम. वाणी यांनी सर्वाधिक १ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे.
आमदारांना त्यांच्या मतदारसंघात लहान-मोठी विकासकामे करण्यासाठी दरवर्षी दोन कोटी रुपयांचा स्थानिक विकासनिधी मिळतो. या निधीतून रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण, काँक्रीटीकरण, सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणी, उघडी गटारे बंदिस्त करणे, विंधन विहिरी घेणे, गावात पथदिवे लावणे, शाळांना संगणक देणे, सांस्कृतिक सभागृह उभारणे, व्यायामशाळा उभारणे, स्मशानभूमी/कब्रस्तानसाठी संरक्षक भिंती बांधणे, उद्यानांचा विकास करणे, गल्लीत गट्टू बसविणे, सामुदायिक विहीर खोदणे, अंध अपंग मतिमंद मुलांच्या शाळांसाठी वर्ग खोल्या बांधणे, प्रयोगशाळांना साहित्य, श्रवणयंत्रे व ब्रेल लिपीची सॉफ्टवेअर पुरविणे, बस थांब्यांवर निवारे बांधणे, ग्रामपंचायत कार्यालय/तलाठी कार्यालय बांधकाम, वाचनालयांना पुस्तके ठेवण्यासाठी रॅक खरेदी आदी कामे करता येतात. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाने दिलेल्या माहितीनुसार हा निधी परत गेला असला तरी अनेक कामांना मागील आर्थिक वर्षात प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे या कामांसाठी येत्या वर्षात निधी मिळणार आहे. प्रशासकीय मंजूरी मिळालेले काम करण्यासाठी दोन वर्षांची मुदत असते. त्यामुळे आज काही आमदारांचा निधी खर्च झाल्याचे दिसत नसले तरी प्रशासकीय मान्यता घेतलेली कामे पूर्ण झाल्यानंतर तो खर्च झालेला दिसेल.
सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील विधानसभेच्या ९ सदस्यांना १८ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. परंतु त्यापैकी केवळ १२ कोटी रुपयांचाच निधी खर्च झाला आहे. उर्वरित ५ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी अखर्चीक राहिल्याने शासनाकडे परत गेला.
सन २०१३-१४ वर्षातील
स्थानिक विकास निधीची स्थिती
आमदाराचे नावउपलब्ध निधीखर्च
अब्दुल सत्तार२ कोटी१ कोटी २५ लाख
हर्षवर्धन जाधव२ कोटी१ कोटी ८४ लाख
कल्याण काळे२ कोटी१ कोटी ३ लाख
प्रदीप जैस्वाल२ कोटी१ कोटी ३ लाख
संजय शिरसाट२ कोटी१ कोटी १८ लाख
राजेंद्र दर्डा२ कोटी१ कोटी १३ लाख
संजय वाघचौरे२ कोटी७१ लाख
प्रशांत बंब२ कोटी१ कोटी ८३ लाख
आर. एम. वाणी२ कोटी१ कोटी ९६ लाख

Web Title: Six crore funds back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.