अल्पवयीन मुलाकडून सहा दुचाकी जप्त

By Admin | Updated: April 22, 2016 00:33 IST2016-04-22T00:17:41+5:302016-04-22T00:33:01+5:30

लातूर : चोरीला गेलेल्या एका दुचाकीच्या शोधात असलेल्या एमआयडीसीच्या विशेष पोलीस पथकाने एका दुचाकीसह अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले असता

Six children seized from a minor child | अल्पवयीन मुलाकडून सहा दुचाकी जप्त

अल्पवयीन मुलाकडून सहा दुचाकी जप्त


लातूर : चोरीला गेलेल्या एका दुचाकीच्या शोधात असलेल्या एमआयडीसीच्या विशेष पोलीस पथकाने एका दुचाकीसह अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले असता त्याच्याकडून अन्य सहा मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत़ दरम्यान, अल्पवयीन आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले असता बुधवारी त्याला त्याच्या आईकडे सुपुर्द करण्यात आले आहे़
लातूर शहरातील चौधरी नगर भागातील तौसिफ सल्लाऊद्दीन खान यांची दुचाकी १२ एप्रिल रोजी घरासमोरून चोरीला गेली होती़ त्यांनी अनेक ठिकाणी गाडीचा शोध घेतला परंतू सापडली नाही़ १८ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्यांनी पॅशन प्रो दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दिली़ याप्रकरणाचा तपास सपोनि़ सुधाकर बावकर यांनी नापोकॉ़ संपत कांदे यांच्याकडे सोपविला़ तपास सुरू असताना १९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एमआयडीसीच्या एकनंबर चौकात प्रकाश नगर भागातील एक १६ वर्षीय मुलगा दुचाकीसह आढळून आला़ यावेळी सपोनि़ सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनात नापोकॉ़ संपक कांदे यांच्यासह डीबीचे राहुल सोनकांबळे, गणेश यादव, प्रकाश भोसले यांनी त्या मुलास दुचाकीसह ताब्यात घेतले़ त्याची अधिक चौकशी केली असता खाडगाव रोड, वाल्मिकी नगर, १२ नंबर पाटी, खोरी गल्ली, विवेकानंद चौक, बसवेश्वर चौक आदी ठिकाणी चोरीला गेलेल्या पाच दुचाकी त्याच्याकडे आढळून आल्या़ एमआयडीसीच्या पोलीस पथकाने सहा दुचाकी जप्त केल्या आहेत़

Web Title: Six children seized from a minor child