शिवालये गजबजली

By Admin | Updated: August 18, 2015 00:11 IST2015-08-18T00:11:29+5:302015-08-18T00:11:29+5:30

बीड : श्रावण महिन्याला रविवारपासून सुरूवात झाली असून, पहिल्या सोमवारी शिवालयांमध्ये महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. येथे हर हर महादेवचा जयघोष ऐकावयास मिळाला.

Sivayal gajabajali | शिवालये गजबजली

शिवालये गजबजली


बीड : श्रावण महिन्याला रविवारपासून सुरूवात झाली असून, पहिल्या सोमवारी शिवालयांमध्ये महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. येथे हर हर महादेवचा जयघोष ऐकावयास मिळाला.
१२ ज्योतिर्लिंगापैकी एक परळी वैद्यनाथाच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून लाखो भाविकांनी रविवारी रात्रीपासूनच गर्दी केली होती. ट्रस्टच्या वतीने भाविकांचे हाल होणार नाही यासाठी नियोजन करण्यात आले होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टिकोनातून चोख पोलीस बंदोबस्त मंदिर व परिसरात तैनात करण्यात आला होता. तसेच सीसीटीव्ही कॅमेचाऱ्यांची नजर भाविकांवर होती.
पापनेश्वर मंदिरात महापूजा
तेलगाव नाक्यावरील पापनेश्वर मंदिरातही भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. परिसरात विविध दुकाने थाटली होती. येथेही महापूजा व आरती झाली. या ठिकाणी भाविकांनी शांततेत दर्शन घेतले.
सोमेश्वर मंदिरात प्रवचन
श्रावण महिन्याचे औचित्य साधून बार्शी रोडवरील सोमेश्वर मंदिरात ह.भ.प. तालखेडकर महाराज यांचे प्रवचन सुरू आहे. तसेच ज्ञानेश्वरी पारायण सुरू आहे. या ठिकाणी भक्तांच्या रांगा लावण्यासाठी ११ संयोजक होते. सकाळी ७ वाजता आरती झाली. त्यानंतर भाविकांनी महाअभिषेक करून दर्शन घेतले. या ठिकाणी तीन पोलीस कर्मचारी होते. महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Web Title: Sivayal gajabajali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.