कृष्णा डोणगावकरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:05 IST2021-03-04T04:05:36+5:302021-03-04T04:05:36+5:30

जामगाव येथील भारत तुपलोंढे हे गंगापूर सहकारी साखर कारखाना आर्थिक घोटाळा प्रकरणात आरोपी असलेले डॉ. गोरख तुपलोंढे यांचे बंधू ...

Sit-in agitation to file a case against Krishna Dongaonkar | कृष्णा डोणगावकरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या आंदोलन

कृष्णा डोणगावकरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या आंदोलन

जामगाव येथील भारत तुपलोंढे हे गंगापूर सहकारी साखर कारखाना आर्थिक घोटाळा प्रकरणात आरोपी असलेले डॉ. गोरख तुपलोंढे यांचे बंधू आहेत. धामोरी येथील विवाहसोहळ्यात कृष्णा डोणगावकरांनी धमकी देऊन पैसे मागितल्याचा आरोप भारत तुपलोंढे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात निवेदन दिले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. मंगळवारी भारत तुपलोंढेसह आमदार बंब समर्थकांनी लासूर स्टेशन पोलीस चौकीसमोर तीन तास ठिय्या आंदोलन करीत गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. यावेळी शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर,पोलीस उपनिरीक्षक सतीश दिंडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल ढाकणे आदींची उपस्थिती होती. दरम्यान याप्रकरणी कृष्णा डोणगावकर यांनी, माजी सभापतीवर मी गुन्हा दाखल केलेला असल्याने ते परेशान असून मी आडवा येत असल्याने मला जेरीस आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.

फोटा : लासूर स्टेशन पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करीत असलेले आ. बंब समर्थक.

020321\img_20210302_193220_1.jpg

लासूर स्टेशन पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करीत असलेले आ. बंब समर्थक.

Web Title: Sit-in agitation to file a case against Krishna Dongaonkar