कंपनीत सोडण्याची थाप मारून केला मेहुणीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:03 IST2021-08-01T04:03:27+5:302021-08-01T04:03:27+5:30

औरंगाबाद : वाळूज येथील कंपनीत नोकरीच्या ठिकाणी सोडतो अशी थाप मारून अल्पवयीन मेहुणीला मोटारसायकलवर सोबत घेतले. वाळूजकडे जाताना तीसगाव ...

The sister-in-law was tortured for leaving the company | कंपनीत सोडण्याची थाप मारून केला मेहुणीवर अत्याचार

कंपनीत सोडण्याची थाप मारून केला मेहुणीवर अत्याचार

औरंगाबाद : वाळूज येथील कंपनीत नोकरीच्या ठिकाणी सोडतो अशी थाप मारून अल्पवयीन मेहुणीला मोटारसायकलवर सोबत घेतले. वाळूजकडे जाताना तीसगाव परिसरातील एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना २९ जुलै रोजी घडली आहे. याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात सख्ख्या दाजीवर पोस्को कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्सूल परिसरातील एका मुलीचा विवाह तीसगाव परिसरातील २२ वर्षीय युवकासोबत झाला. पत्नी गरोदर असल्यामुळे ती हर्सूल परिसरातील माहेरी बाळंतपणासाठी आली होती. पत्नीला भेटण्यासाठी २९ जुलै रोजी सकाळी तिचा नवरा घरी आला. पत्नीला भेटल्यानंतर वाळूज येथील एका कंपनीत नोकरीला असलेल्या १७ वर्षीय मेहुणीला कंपनीत सोडतो, असे सांगून तो तिला घेऊन गेला. मात्र, त्याने मेहुणीला तीसगाव परिसरातील एका लॉजवर नेले व तिच्यावर अत्याचार केले. अत्याचार केल्यावर मेहुणीला कंपनीच्या दारात नेऊन सोडले व तो पसार झाला. मात्र, उशीर झाल्यामुळे कंपनी प्रशासनाने संबंधित तरुणीला आतमध्ये घेतले नाही. तिच्याकडे मोबाइल नसल्यामुळे ती चालत एका चौकात आली. तेथून तिने एका व्यक्तीच्या मोबाइलवरून दाजीला घरी सोडण्याची विनंती केली. मात्र, त्याने सोडण्यासाठी येण्यास नकार दिला. त्यानंतर पीडित तरुणी एका व्यक्तीसोबत घरी परतली. मेहुण्याने केलेल्या कृत्याची घटना तिने घरी सांगितल्यानंतर हर्सूल पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

या तक्रारीनुसार सख्खा दाजीविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अतुलकुमार ठोकळ करीत आहेत.

चौकट.................

आरोपीला पोलीस कोठडी

अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला हर्सूल पोलिसांनी तत्काळ अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता ३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: The sister-in-law was tortured for leaving the company