वैजापूर : भावाचा मृतदेह घेऊन मूळ गावी उत्तर प्रदेशात जात असलेल्या बहिणीचा भरधाव वेगातील रुग्णवाहिकेने ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री एक वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावर जांबरगाव शिवारात घडली. सावित्रीदेवी भागवती प्रसाद यादव (वय ४९, रा. मुंबई), असे मयत महिलेचे नाव आहे.
उत्तर प्रदेशातील यादव कुटुंबीय सध्या मुंबई येथे राहतात. सावित्रीदेवी भागवती प्रसाद यादव यांचे भाऊ लालजी यादव (६५) यांचे हृदयविकाराने निधन झाले होते. त्यामुळे त्यांचा मृतदेह मुंबई येथून मूळ गावी उत्तर प्रदेश येथे रुग्णवाहिकेतून यादव कुटुंबातील ४ सदस्य व चालक, असे ५ जण जात होते. रात्री एक वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावर जांबरगाव शिवारात भरधाव वेगाने जाणाऱ्या त्यांच्या रुग्णवाहिकेने (बीडी ०३ टी ९७२५) पाठीमागून ट्रकला जोराची धडक दिली.
या अपघातात रुग्णवाहिकेतून प्रवास करणाऱ्या सावित्रीदेवी यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती भगवती प्रसाद यादव हे गंभीर जखमी झाले. इतर तिघांना किरकोळ दुखापत झाली. याप्रकरणी संदीपकुमार भगवती प्रसाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रुग्णवाहिका चालकाविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Summary : A woman died and her husband was seriously injured on the Samruddhi highway after the ambulance carrying her deceased brother's body collided with a truck. The family was traveling from Mumbai to Uttar Pradesh when the accident occurred near Jambergaon. Police have registered a case against the ambulance driver.
Web Summary : समृद्धि महामार्ग पर एक एम्बुलेंस दुर्घटना में एक महिला की मौत हो गई और उसका पति गंभीर रूप से घायल हो गया। एम्बुलेंस में उसके मृत भाई का शव था। परिवार मुंबई से उत्तर प्रदेश जा रहा था, तभी जांबरगाँव के पास हादसा हुआ। पुलिस ने एम्बुलेंस चालक के खिलाफ मामला दर्ज किया है।