सिरेहक शाह बाबांच्या संदलची मिरवणूक
By Admin | Updated: April 25, 2016 23:31 IST2016-04-25T23:24:28+5:302016-04-25T23:31:22+5:30
हिंगोली : येथील रिसाला बाजार परिसरातील धार्मिक एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत सिरेहक शाह बाबा रहेमतुल्ला अलैह यांच्या उरूसानिमित्त शहरात आज (२५ रोजी) संदल काढण्यात आला.

सिरेहक शाह बाबांच्या संदलची मिरवणूक
हिंगोली : येथील रिसाला बाजार परिसरातील धार्मिक एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत सिरेहक शाह बाबा रहेमतुल्ला अलैह यांच्या उरूसानिमित्त शहरात आज (२५ रोजी) संदल काढण्यात आला.
सायंकाळी पाचच्या सुमारास रिसाला बाजार भागातून संदल निघाला. रेल्वेस्थानक मार्ग, आरा मशिन लाईन, जुने सरकारी रुग्णालय मार्ग, जवाहर रोड, गांधी चौक, इंदिरा चौक, अकोला रोड मार्गे रिसाला बाजार येथील दरगाह परिसरात संदलचे समापन झाले. अध्यक्षस्थानी माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा अनिता सूर्यतळ, उपनगराध्यक्ष जगजितराज खुराणा, दिलीप चव्हाण, सुरेशसराफ, शिवशंकर सराफ, बिरजू यादव, मिलींद उबाळे, जहिरखॉ पठाण, कमलशाह बाबा बरेना, मुशिरबाबा इसापूरवाले, मनोज जैन, शे. कलीम गुड्डू आदी मान्यवर उपस्थित होते. हजरत सिरेहक शाह बाबा रहेमतुल्ला अलैहच्या उरूसानिमित्त औरंगाबाद, जालना, नांदेड, लातूर, परभणीसह आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यातील भाविकांनी येथे हजेरी लावली. दरगाह परिसरात तीन दिवस अन्नदान कार्यक्रम ठेवला आहे.
यासाठी शम्मीखान पठाण, आझम, अनु पहलेवान, बाबूलाल यादव, शब्बूअण्णा देशमुख, शे. कठालू, हारूण पठाण, मझहर पठाण, मुजावर शौकत भाई, तीलक यादव, जनार्दन शिंदे, साहेबराव कांबळे, सय्यद सालार, शेख नूर मिस्त्री, दत्ता बांगर, नुसरतखान पठाण आदींनी परिश्रम घेतले. २६ एप्रिल रोजी दर्गाह परिसरात सायंकाळी ५ वाजता कव्वाली तर २७ रोजी मुशायऱ्याचे आयोजन केले आहे. (प्रतिनिधी)