शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

साहेब, चपरासीसुद्धा फिरकला नाही; अतिवृष्टीग्रस्त शेतकरी ढसाढसा रडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 11:38 IST

आता तोंडाशी आलेल्या खरीप पिकांचे शेवटच्या टप्प्यात परतीच्या अतिवृष्टीने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा जवळपास शंभर टक्के खर्च करून झालेला होता

औरंगाबाद - जिल्ह्यातील करमाड तालुक्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.कल्याण काळे यांचा अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त क्षेत्रात पीक पाहणी दौरा सुरू आहे. यात बुधवारी फेरन जळगाव व ढवळापुरी या भागात पाहणी सुरू असता ढवळापुरी येथील शेतकरी अक्षरशः ढसाढसा रडले. सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी, महसूल विभाग किंवा कृषी विभागाचे कोणीही साधे पंचनामा करायला देखील आले नसल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहे.

आता तोंडाशी आलेल्या खरीप पिकांचे शेवटच्या टप्प्यात परतीच्या अतिवृष्टीने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा जवळपास शंभर टक्के खर्च करून झालेला होता. पुढील पंधरा दिवसात सोयाबीन, मूग , उडीद अशा पिकांची सोंगणीची वेळ आली होती. कपाशीच्या देखील अनेक ठिकाणी कैऱ्या सडल्या असून ज्या ठिकाणी कापूस लागलेला आहे तो कापूस देखील पूर्ण भिजून गेलेला आहे. डाळिंबासारख्या फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. त्यामुळे शासनाने हेक्टरी 50 हजार ची मदत करावी अशी मागणी डॉ.कल्याण काळे यांनी केलेली आहे.  औरंगाबाद जिल्ह्याला पहिल्यांदा कृषी मंत्री पद तर अनेक वर्षानंतर स्थानिक पालकमंत्र्यांकडे सहकार मंत्री पद मिळाल्याने आपण त्यांच्याकडे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणार असून ते देखील ही परिस्थिती समजून मदत करतील अशी अपेक्षा काळे यांनी व्यक्त केली. मात्र शासनाने जर झोपेचे सोंग घेतले तर वेळप्रसंगी आंदोलन करून शेतकऱ्यांना मदत देईपर्यंत मंत्र्यांना बाहेर फिरू देणार नाही. असा  इशारा देखील त्यांनी यावेळी दिला 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीcongressकाँग्रेसministerमंत्री