सिंगल कॉलम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:11 IST2021-01-08T04:11:49+5:302021-01-08T04:11:49+5:30
औरंगाबाद : दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या दिव्यज्योती फाऊंडेशनतर्फे नववर्षानिमित्त कडा कार्यालयाच्या मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ४०० पेक्षा अधिक ...

सिंगल कॉलम
औरंगाबाद : दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या दिव्यज्योती फाऊंडेशनतर्फे नववर्षानिमित्त कडा कार्यालयाच्या मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ४०० पेक्षा अधिक रोपे लावण्यात आली.
आर्य समाजाचे कोषाध्यक्ष ॲड. जोगेंद्रसिंग चौहान यांच्या हस्ते वृक्षारोपणाची सुरुवात झाली. प्रयास युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष रवी चौधरी, दिव्यज्योती फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश मुंढे, भागवत पाटील, निकेश मदारे, परमेश्वर कोरडे, विठ्ठल भले, शैलेश हेकाडे, अमित नागरे यांच्यासह अनेक युवकांची यावेळी उपस्थिती होती.
----
संस्थेचे नाव न बदलण्याबाबत कुलगुरूंना निवेदन
औरंगाबाद : दि ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्स या संस्थेचे नाव बदलू नये व या समितीचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे यांची या समितीतून हकालपट्टी करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील ही संस्था कार्यान्वित होऊन राजकारणात येणाऱ्या तरुण पिढीला मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे संस्थेचे पूर्वीचेच नाव कायम ठेवून ही संस्था तात्काळ सुरू करावी, अशी मागणी नागराज गायकवाड यांच्यासह अन्य सदस्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
-------
संक्रांतीसाठी बाजारपेठेत गर्दी
औरंगाबाद : संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी महिलांची गर्दी सुरू झाली आहे. साड्या, वाणाचे सामान यासह तीळ- गुळ, हलवा घेण्यासाठी दुकानांमध्ये सध्या महिलांची लगबग सुरू आहे.
-----------
पथदिवे बंद
औरंगाबाद : एन-२ सिडको परिसरातील मुख्य रस्त्यावरील दिवे रात्रीच्या वेळी चालू असतात. मात्र, अंतर्गत वस्त्यांमधील दिवे बंद असल्याने परिसरात सर्वत्र अंधार असतो. यामुळे रात्रीच्या वेळी परिसरातून जाताना भीती वाटत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
---------
स. भु. येथे मोफत शिकवणी वर्ग
औरंगाबाद : नुकत्याच झालेल्या दहावी पुरवणी परीक्षेत एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी स. भु. महाविद्यालयात नापास झालेल्या विषयांसाठी ४ जानेवारीपासून मोफत शिकवणी वर्ग सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी प्राचार्य डॉ. मकरंद पैठणकर व उपप्राचार्य प्रा. संजय गायकवाड यांनी केले आहे.