दाम्पत्याचे एकाचवेळी रक्दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:03 IST2021-07-03T04:03:26+5:302021-07-03T04:03:26+5:30

------------- देशसेवेत पराक्रमाची उंची गाठायची लोकमत रक्तदान महायज्ञात आज सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते ७ फूट २ इंच उंच ...

Simultaneous blood donation of the couple | दाम्पत्याचे एकाचवेळी रक्दान

दाम्पत्याचे एकाचवेळी रक्दान

-------------

देशसेवेत पराक्रमाची उंची गाठायची

लोकमत रक्तदान महायज्ञात आज सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते ७ फूट २ इंच उंच असलेल्या अभिषेक अंभोरे या २१ वर्षांच्या तरुणाने. त्याची उंची पाहून अनेकांना त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. मुळचा बुुुलडाणा जिल्ह्यातील असलेल्या या तरुणाला आर्मीमध्ये भरती व्हायचे आहे. देशाची सेवा करण्याच्या प्रबळ इच्छेने त्याला औरंगाबादेत खेचून आणले. येथील हडको परिसरातील डिफेन्स करिअर ज्यु. कॉलेजमध्ये तो सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण घेत आहे. त्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. आज त्याने आयुष्यात दुसऱ्यांदा रक्तदान केले. ७ फूट २ इंच उंची असल्याने मी प्रसिद्ध होत आहे. पण, मला देश सेवेत पराक्रमाची उंची गाठायची आहे, हेच जीवनाचे ध्येय असल्याचे त्याने सांगितले. रक्तदानासाठी नवयुवकांनी पुढे यावे, असे आवाहनही त्याने केले.

Web Title: Simultaneous blood donation of the couple