विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण सरल प्रणालीमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 23:43 IST2017-11-18T23:42:33+5:302017-11-18T23:43:40+5:30

प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांची प्रगती पडताळण्यासाठी पायाभूत व संकलित चाचण्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक शाळेतील शिक्षकांना सदर विद्यार्थ्यांची विषयनिहाय गुण सरल प्रणालीत भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 In the simple system of the subject matter of the students | विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण सरल प्रणालीमध्ये

विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण सरल प्रणालीमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांची प्रगती पडताळण्यासाठी पायाभूत व संकलित चाचण्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक शाळेतील शिक्षकांना सदर विद्यार्थ्यांची विषयनिहाय गुण सरल प्रणालीत भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शिक्षण विभागातर्फे ८ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत पायाभूत व संकलित १ चाचणी घेण्यात आली. पहिली ते नववी व दुसरी ते आठवी मधील विद्यार्थ्यांना चाचण्यांमध्ये मिळालेले विषयनिहाय गुण भरण्याची सुविधा सरल प्रणालीमध्ये सुरू करून देण्यात आली आहे. प्रत्येक शाळेतील वर्ग शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद पायाभूत चाचण्यामध्ये करून केली जात आहे. परंतु सदरची प्रगती समाधानकारक नसल्यामुळे तत्काळ विद्यार्थ्यांचे गुण भरण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी संबधित गशिअ यांना १७ नोव्हेंबर रोजी दिल्या आहेत. विद्यार्थ्यांची ऐच्छिक पद्धतीने निवड करून चाचणीचे गुण आॅनलाईन पद्धतीने लॉगिनला भरावे लागणार आहेत. त्यासाठी आॅनलाई लॉगिन करावे लागणार आहे. संबंधित संकेत स्थळावर विद्यार्थ्यांचे गुण भरून घेतले जाणार आहेत.
याबाबत शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकाºयांनी सरल प्रणालीमध्ये आपल्या लॉगिनमधून विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद तत्काळ करावी लागेल. विद्यार्थ्यांच्या गुणांची माहितीसंदर्भात विनाविलंब कार्यवाही करण्याच्या सूचनाही परिपत्रकाद्वारे सर्व तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकाºयांना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांची एच्छिक पद्धतीने निवड करून चाचणीचे गुण आॅनलाईनद्वारे लॉग इनला भरायचे आहेत.
सदर माहिती अचूकपणे संबधित संकेतस्थळावर भरली जाणार आहे. याबाबत गटशिक्षणाधिकाºयांना कळविण्याचे आल्याचे सर्व शिक्षा अभियानकडून सांगण्यात आले.

Web Title:  In the simple system of the subject matter of the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.