चिन्हांचा बिनधास्त वापर !

By Admin | Updated: September 21, 2014 00:26 IST2014-09-20T23:55:27+5:302014-09-21T00:26:23+5:30

आशपाक पठाण/ हरी मोकाशे ,लातूर निवडणूक कालावधीत घर, खाजगी वाहनांवर निवडणूक चिन्हांचा वापर करणे हे कायदेशीररित्या गुन्हा ठरत असला तरी त्याकडे वाहनधारकांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

Silly use of icons! | चिन्हांचा बिनधास्त वापर !

चिन्हांचा बिनधास्त वापर !


आशपाक पठाण/ हरी मोकाशे ,लातूर
निवडणूक कालावधीत घर, खाजगी वाहनांवर निवडणूक चिन्हांचा वापर करणे हे कायदेशीररित्या गुन्हा ठरत असला तरी त्याकडे वाहनधारकांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे शनिवारी शहरात पहावयास मिळाले़ निवडणूक चिन्हांचा बिनधास्त वापर करीत हे वाहनधारक नेहमीच्या तोऱ्यात फिरत आहेत़ आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, अशी दक्षता घेणारा जिल्हा निवडणूक विभाग मात्र, यासंदर्भात गाफिल आहे़
लोकमत चमूने लातूर शहरात विविध ठिकाणी वाहनांची पाहणी केली़ त्यात अनेक नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या वाहनांवर राजकीय पक्षांचे चिन्ह, झेंडे असल्याचे आढळून आले़ लातूर शहर व ग्रामीण भागात आचारसंहितेची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने पथकांची नेमणूक केली आहे़ मात्र, पथकाने संबंधित यंत्रणांना सूचना देत केवळ सार्वजनिक ठिकाणी असलेले झेंडे, पक्षाचे नामफलक व उद्घाटनासंबंधी असलेल्या कोनशिला झाकून घेतल्या़ अनेक भागातील झेंडे उतरविण्यात आले़ सार्वजनिक ठिकाणी कारवाई केलेल्या पथकाने खाजगी वाहनांकडे मात्र नजर फिरविली नसल्याचे दिसून आले़
जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, महानगरपालिका, जिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी लोकमत चमूने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची पाहणी केली़ यावेळी अनेक वाहनांवर राजकीय पक्षाचे चिन्ह व झेंडे आढळून आले़ विशेष म्हणजे दुचाकी वाहनांवर निवडणूक चिन्हांचा सर्वाधिक वापर होत असल्याचे पहावयास मिळाले़ हे वाहनधारक बिनधास्तपणे निवडणूक चिन्हांचा वापर करीत आहेत़
विशेष म्हणजे काहीजण निवडणूक चिन्हांचा वापर हा प्रचारासाठी करीत असल्याचेही दिसून येत आहे़ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टी तसेच अन्य पक्षांच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवर पक्षाचे चिन्ह किंवा पक्षाचे नाव तसेच नेत्यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत़
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांच्या नावाचे फलक व झेंडे लावण्याची लातूर शहरात मोठी स्पर्धाच लागली होती़ गणेशोत्सवात लावण्यात आलेले पोस्टर्स आचारसंहितेची चाहूल लागताच मनपाच्या अतिक्रमण विभागाने काढली़ काही भागातील सार्वजनिक ठिकाणचे ध्वजही काढण्यात आले़ मात्र, शहराच्या अनेक ठिकाणी आजही विविध संघटनांचे फलक, तसेच चौकाच्या नामकरणाचे फलक झळकत असल्याचे आढळून आले़ लातूर शहरात विविध सामाजिक संघटनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ आॅटोरिक्षा, स्कुल बस तसेच अन्य वाहनांवर संघटना व त्यांच्या अध्यक्षांची नावे लिहिण्यात आली आहे़

Web Title: Silly use of icons!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.