शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सिल्लोड तालुक्याची तहान वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 01:31 IST

९९ गावांत ‘पाणीबाणी’: वाढत्या तापमानामुळे टंचाईच्या झळाही तीव्र; प्रशासनाची कसरत

श्यामकुमार पुरेसिल्लोड : सिल्लोड शहरासह तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वाढत्या तापमानामुळे दिवसेंदिवस टंचाईच्या झळाही तीव्र होत असून तालुक्यातील ५९ गावांना ८४ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून २३ गावांसाठी ४६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. १७ गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव प्रलंबित असल्याने तालुक्यातील तब्बल ९९ गावांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.सिल्लोड शहराला खेळणा येथील खोदलेल्या चारीतून दर सहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. चारनेर-पेंडगाव व केळगाव वगळता सर्वच प्रकल्प कोरडे पडल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. चारनेर-पेंडगाव प्रकल्पाच्या संपादीत क्षेत्रातील विहिरी प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. २०१२ च्या दुष्काळाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. थेंब थेंब पाण्यासाठी प्रशासन तारेवरची कसरत करताना दिसत आहे. केळगाव, जांभई जलसाठ्यावर टँकरला पाणी भरण्यासाठी २४ तास वीजपुरवठा करावा, असे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी देऊन देखील त्याची अंमलबजावणी महावितरणकडून होताना दिसत नाही.या गावांची तहान टँकरवरतालुक्यातील मोहाळ, टाकळी जिवरग, पिंपळगाव पेठ, वांगी बुर्द, पळशी, लोणवाडी, पानस, कायगाव, बोजगाव, वरुड पिंप्री, सराटी, अंधारी, बोदवड, वडोदचाथा, बाळापूर, अनाड, देऊळगाव बाजार, वडाळी टाका, धावडा, जळकी घाट, पांगरी, डकला, धानोरा, केºहाळा तांडा, पिंपळदरी, पिंपळदरीवाडा, मुखपाठ, दीडगाव, कोटनांद्रा, धोत्रा, चिंचपूर, तलवाडा, गव्हाली, पिरोळा, म्हसला खुर्द, सावखेड़ा खु -बु, डोंगरगाव, बहुली, भराडी, चिंचवण, रेलगाव वाडी, नानेगाव वस्ती, पालोद वाडी, मांडगाव, मुर्डेश्वर वस्ती, शिरसाळा तांडा, बोरगाव सारवाणी, गोळेगाव बु, हळदा, वांगी खु, गव्हाली तांडा, उपळी, खातखेडा, पानवडोद खु, टाकळी खु, मांडणा वाडी, मोढा आदी ५९ गावांमध्ये ८४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.१७ गावांचे प्रस्ताव प्रलंबितपानवडोद खुर्द, वाडी, चिंचपूर, लोणवाडी, सासूरवाडा, निल्लोड वाड्या, भवन वाड्या, गोळेगाव खुर्द, जंजाळा, नाटवी, उंडणगाव वाड्या, आसडी, डोंगरगाव, पिंपळदरी, कोटनांद्रा, नानेगाव, वडाळा, गव्हाली या गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.पाणी जपून वापरण्याचे आवाहनसिल्लोड शहराला पाणीपुरठा करणारा खेळणा प्रकल्पात ३० बाय १० मीटर आकाराचे दोन नवीन चर खोदण्यात येत असून दोन दिवसांपूर्वीच हे काम हाती घेण्यात आले आहे. तर जुन्या चरातील साचलेला गाळ मशीनद्वारे काढण्यात येत आहे. नवीन चरला काही प्रमाणात पाणी लागले असून चराची लांबी रुंदी व खोली वाढताच त्यात पाणीसाठा वाढताच शहराला पाणीपुरठा केला जाईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा व नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले आहे.सिल्लोड शहराला तीन दिवसांत पाणी पुरवूयंदा दुष्काळाची पुनरावृत्ती झाली असून २०१२ मध्ये ९० गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता तर तब्बल १२५ टँकरने या गावांना पाणीपुरवठा केला जात होता. हीच परिस्थिती यंदा उद्भवली आहे. खेळणा धरण क्षेत्रात पाऊसच पडला नाही तरीही चरातून प्रती माणसी शासनाच्या २० लिटर पाण्याऐवजी प्रती माणसी चाळीस लिटर पाणी पुरविणार आहे. धरणातच दोन चर खोदण्याचे काम हाती घेतले असून चरातून पाणी उपलब्ध होताच सिल्लोड शहराला तीन दिवसात पाणी पुरवू, अशी माहिती आ. अब्दुल सत्तार यांनी दिली.फोटो....सिल्लोड येथील खेळणा मध्यम प्रकल्पात चर खोदकामाची पाहणी करताना आ. अब्दुल सत्तार व न.प. अधिकारी.

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीकपात