९५ टक्के ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सिल्लोडचे राज फुटवेअर (पुरवणी लेख)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:05 IST2021-02-26T04:05:57+5:302021-02-26T04:05:57+5:30
सिल्लोड : सिल्लोड शहरातील राज फुटवेअर हे वधू-वरांच्या पसंतीस खरे उतरले असून शहरात ‘लोकमत’ ने केलेल्या एका सर्व्हेनुसार ९५ ...

९५ टक्के ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सिल्लोडचे राज फुटवेअर (पुरवणी लेख)
सिल्लोड : सिल्लोड शहरातील राज फुटवेअर हे वधू-वरांच्या पसंतीस खरे उतरले असून शहरात ‘लोकमत’ ने केलेल्या एका सर्व्हेनुसार ९५ टक्के नागरिक व वधू-वर लग्नासाठी बूट असो की, चप्पल येथूनच खरेदी करतात. किफायतशीर भाव व दर्जेदार नामांकित कंपनीचे बूट व चप्पल हे राज फुटवेअरचे वैशिष्ट्य ठरले आहे. राज फुटवेअरवर ग्राहकांनी भरभरून प्रेम दिले आहे. राज फुटवेअरवर खरेदीसाठी कायमच ग्राहकांची तुफान गर्दी होताना दिसत आहे.
ग्राहकांसाठी खास आकर्षक विविध नामांकित कंपन्यांचे रेडचिप, स्पार्क, रिबॉक, प्युमा, पेरागॉनसह इतरही अनेक ब्रँडेड कंपन्यांचे शूज, सँडल, चप्पल ३५० रुपयांपासून ते ४ हजार २०० रुपयांपर्यंत बुट व नवरीसाठी २५० रुपयांपासून ते १८०० पर्यंत डिझायनर चप्पल मिळते. याशिवाय शाळेचे विद्यार्थी, सामान्य नागरिक, तरुण युवक येथे खरेदीसाठी गर्दी करीत आहेत.
चौकट..(याला बोल्ड करावे..यलो कलर घ्यावा)
औरंगाबाद शहरातून खरेदीसाठी वधू-वर
औरंगाबाद शहरातून खरेदीसाठी वधू-वर सिल्लोड शहरातील राज फुटवेअरमध्ये येताना दिसत आहेत. खान्देश, विदर्भ, मराठवाड्यासाठी राज फुटवेअर हे नामांकित दुकान झाले आहे. बुट, चप्पल, असो की सँडल खरेदी केवळ याच दुकानात करावी. बुट, चप्पल पाहिजे तर ती केवळ राज फुटवेअरमधूनच खरेदी करणार, असा आग्रह ग्राहक, नववधू-वर करीत आहेत.
राजने ग्राहकांचा विश्वास जिंकला
सिल्लोडच्या अन्य मार्केटपेक्षा सर्वात कमी दर, रास्त भाव व विश्वास हे या दुकानाचे वैशिष्ट्य आहे. येथे बुट, चप्पल, सँडल, विविध साहित्य मिळत असल्याने राज फुटवेअर नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. वधू-वरांचे तर हे आवडते शोरूम झाले आहे.
राज फुटवेअर प्रथम
सिल्लोड शहरात नावाजलेले मोठे शोरूम म्हणून राजफुटवेअरची ओळख आहे. शाळेतील मुलांना लागणारे सर्व प्रकारचे स्कूल बुट, चप्पल, सँडल, सॉक्स येथे कमीत कमी दरात मिळतात. त्यामुळे सिल्लोड शहरासह औरंगाबाद, फुलंब्री, सोयगाव, भोकरदन, कन्नड तालुक्यांतील अनेक विद्यार्थी याठिकाणीच बूट, चप्पल, सँडल खरेदी करतात. विविध शाळांच्या विद्यार्थ्यांना लागणारे सर्व फुटवेअर साहित्य येथे उपलब्ध आहेत.
ब्रँडेड पार्टीवेअर बुट, चप्पल मिळते...
खास लग्न कार्य पार्टी विविध कार्यक्रमात जाण्यासाठी लागणारे ब्रँडेड आकर्षक शूज, चप्पल, सँडल येथे मार्केटपेक्षा रास्त भावात मिळत असल्याने व जास्त दिवस टिकत असल्याने येथे गर्दी होत आहे.
आश्चर्य नसून वास्तव
रेडचिप, स्पार्क, स्पोस, रिबॉक, क्युमा, पेरागॉनसहित विविध ब्रँडेड कंपन्यांचे शूज, सँडल, चप्पल राज फुटवेअरमध्ये अगदी माफक दरात मिळत असल्याने औरंगाबाद, जळगाव, बुलडाणा मराठवाडा येथील ग्राहकसुद्धा खरेदीसाठी सिल्लोडला येतात.. हे आश्चर्य नसून वास्तव आहे.
कमी वेळेत नावलौकिक...
ग्रामीण भागातील भराडी, घाटनांद्रा, निलोड, बोरगाव बाजार, आमठाणा, गोलेगाव, अजिंठा, शिवना, उंडणगाव, भवन, पालोद, अंधारी, केऱ्हाळा, परिसरातून वधू - वर, शालेय विद्यार्थी, नागरिक खरेदीसाठी येथे गर्दी करीत आहेत. सिल्लोड तालुक्यात राज फुटवेअरने कमी वेळेत नावलौकिक मिळवला आहे.
खरेदी केवळ राज फुटवेअरमधून...
सिल्लोड शहरातील या नामांकित राज फुटवेअरला आपणही एकदा भेट द्यावी..त्यानंतर दुसरीकडून आपण कधी बुट, चप्पल, सँडल खरेदीच करणार नाही.