सिल्लोड- सोयगावमधील १४ ग्रामपंचायत कार्यालय बांधकामाला मंजूरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:04 IST2021-04-08T04:04:26+5:302021-04-08T04:04:26+5:30
सिल्लोड : सोयगाव-सिल्लोड मतदार संघातील १४ ग्रामंपचायत कार्यालयांच्या बांधकामाला ग्रामविकास मंत्र्यांनी परवानगी दिली आहे. यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ...

सिल्लोड- सोयगावमधील १४ ग्रामपंचायत कार्यालय बांधकामाला मंजूरी
सिल्लोड : सोयगाव-सिल्लोड मतदार संघातील १४ ग्रामंपचायत कार्यालयांच्या बांधकामाला ग्रामविकास मंत्र्यांनी परवानगी दिली आहे. यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाठपुरावा केला होता.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास साधला जातो. मात्र, अनेक ग्रामपंचायतींना स्वतःची हक्काची कार्यालयासाठी जागाच नसल्याचे समोर आले आहे. ग्रामपंचायतींना स्वत:ची जागा व इमारत असावी, अशी मागणी संबंधित गावकऱ्यांनी केली होती. आता याला मान्यता मिळाल्याने त्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ग्रामविकास मंत्र्यांनी दिलेल्या मंजुरीमध्ये सिल्लोड तालुक्यातील धोत्रा, जळकी बाजार, म्हसला खुर्द, बोरगाव सारवणी, गव्हाली तांडा, मुखपाठ, आमसरी, रहिमाबाद, गेवराई शेमी, अंधारी, वसई जळकी, नाणेगाव, जंजाळ या तेरा गावांचा समावेश आहे तर सोयगाव तालुक्यातील घाणेगाव या ग्रामपंचायतीचाही समावेश आहे.