रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा मोर्चा
By Admin | Updated: March 17, 2016 23:52 IST2016-03-17T23:48:58+5:302016-03-17T23:52:14+5:30
हिंगोली : येथील जिल्हा रेशीम उद्योग कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदलीसह इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीवर १७ मार्च रोजी मोर्चा काढला.

रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा मोर्चा
हिंगोली : येथील जिल्हा रेशीम उद्योग कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदलीसह इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीवर १७ मार्च रोजी मोर्चा काढला.
जिल्हाभरातील विविध भागात रेशीम उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु जिल्हा रेशीम उद्योग कार्यालयातील कर्मचारी काही शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत. काही शेतकऱ्यांकडून किटक संगोपनाच्या अनुदानासाठी कर्मचाऱ्यांकडून आर्थिक लूट होत असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यापूर्वीही या शेतकऱ्यांना निवेदन दिले होते. परंतु त्यानंतरही फारसी सुधारणा झाली नसल्याने मोर्चा काढण्यात आला. निवेदनावर आनंता पाटील, जगन पुरी, आरविंद पोेले, सर्जेराव पोले, सोनाजी इंगळे, सुरेश खिल्लारे, बाळू काळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)