शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ औरंगाबादचे शीख बांधव एकवटले, धरणे धरून मोदींविरुद्ध व्यक्त केला रोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:02 IST2020-12-27T04:02:16+5:302020-12-27T04:02:16+5:30
सकाळी ११ वाजेच्या सुमारास धरणे आंदोलन सुरू झाले. दोन तासांनंतर दुपारी १ वाजता हे आंदोलन संपले. शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हा ...

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ औरंगाबादचे शीख बांधव एकवटले, धरणे धरून मोदींविरुद्ध व्यक्त केला रोष
सकाळी ११ वाजेच्या सुमारास धरणे आंदोलन सुरू झाले. दोन तासांनंतर दुपारी १ वाजता हे आंदोलन संपले.
शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हा प्रमुख व आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाठ, माजी महापौर नंदू घोडेले आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आंदोलन स्थळी आणलेली बैलगाडी आणि ट्रॅक्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
आदेशपालसिंग छाबडा, सुरेंद्रसिंग साबरवाल, रणजितसिंह गुलाटी, नवीनसिंग ओबेरॉय, राजेंद्रसिंग जबिंदा, हरिसिंग काचवाला, राजेंद्रसिंग चंढोक आदींनी यावेळी मते मांडली. सरकार अन्नदात्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची भावना सर्वांनीच व्यक्त केली.
रमेशसिंग बिंद्रा, खुशबिरसिंग चंढोक, परविंदरसिंग कौशल, भागिंदरसिंग कानसा, इंदरसिंग छटवाल, गुरुबचनसिंग फौजी, सखबिरसिंग बिंद्रा, दर्शनसिंग दान, नरेंद्रसिंग जबिंदा, लखबीरसिंग कलोटी, राजेंद्रसिंग ग्रंथी, लक्ष्मणसिंग पवार, हरमीतसिंग वकील, हरविंदसिंग ढोडी, मनिंदरजितसिंग ग्रंथी, प्रेमसिंग राठोड, मुन्नासिंग कौशल, गुरदीपसिंग चहल, मनजितसिंग कानसा, अमोलकसिंग, बलदेवसिंग खालसा, दर्शनसिंग दखन तसेच शिवसेनेचे गजानन बारवाल, विश्वनाथ स्वामी, रमेश इधाटे पाटील, सिद्धार्थ वडमारे, अनिल पोलकर, सोमनाथ बोंबले, मीरा देशपांडे, विद्या अग्निहोत्री, सुनीता औताडे, गौराबाई जाटवे, शारदा घुले पाटील, मोहन मेघावाले, विजय वाघचौरे, रमेश बहुले, दिनेश मुथा, पवन जैस्वाल, नंदू लबडे, सुरेश पहाटे, पंकज वाडकर आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.