रेल्वेमार्गासाठी आजपासून स्वाक्षरी मोहीम

By Admin | Updated: May 1, 2015 00:49 IST2015-05-01T00:39:15+5:302015-05-01T00:49:00+5:30

भोकरदन : सोलापूर - जळगाव रेल्वेमार्ग भोकरदन मार्गेच मंजूर करण्यात यावा या मागणीसाठी रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने १ मे म्हणजे महाराष्ट्र दिनी स्वाक्षरी मोहीम अभियान राबविण्यात येणार आहे.

A signature campaign for the railway route today | रेल्वेमार्गासाठी आजपासून स्वाक्षरी मोहीम

रेल्वेमार्गासाठी आजपासून स्वाक्षरी मोहीम


भोकरदन : सोलापूर - जळगाव रेल्वेमार्ग भोकरदन मार्गेच मंजूर करण्यात यावा या मागणीसाठी रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने १ मे म्हणजे महाराष्ट्र दिनी स्वाक्षरी मोहीम अभियान राबविण्यात येणार आहे.
हा रेल्वेमार्ग गेवराई, अंबड, जालना, राजूर, भोकरदन, सिल्लोड, अंजिठा लेणी मार्गे जळगाव असा मंजुर करण्यात यावा यामागणीसाठी २८ एप्रिल रोजी नगर परिषद कार्यालयात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी हा रेल्वेमार्ग जालना, राजूर, भोकरदन मार्गेच मंजूर झाला पाहिजे जेणे करून या भागातील दळणवळाणाची सोयनिर्माण होणार असून बाजारपेठेला सुध्दा मोठा फायदा होणार आहे. तसेच राजूर, अंजिठा हे दोन्ही धार्मिकस्थळे या मार्गाने जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे हा रेल्वेमार्ग मंजूर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच ही मागणी मंजूर करण्यासाठी १ मे रोजी सकाळी ७ वाजता स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे या बैठकीत ठरविण्यात आले आहे. या बैठकीला उपनगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड हर्षकुमार जाधव, नगराध्यक्ष चंद्रकांत पगारे, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरेश तळेकर, महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा डॉ सुनीता सांवत, व्यापारी संघाचे अध्यक्ष पंढरीनाथ खरात, त्र्यंबकराव पांबळे, एजाज पठाण, नारायण जिवरग, इरफान सिद्दीकी, राजेंद्र दारूंटे, नानासाहेब वानखेडे, सुरेश बनकर, रमेश इंगळे, दयानंद पगारे, विकास ठाकुर, मसुदभाई, बलराम इंगळे, सोपान सपकाळ, कन्हय्या बडगुजर आदी उपस्थित होते.

Web Title: A signature campaign for the railway route today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.