दारू दुकान हद्दपार करा...!
By Admin | Updated: April 8, 2017 23:44 IST2017-04-08T23:39:26+5:302017-04-08T23:44:07+5:30
दाभाडी : बदनापूर तालुक्यातील दाभाडी गावातील देशी दारूचे दुकान गावाबाहेर हटविण्याची मागणी गावातील महिला बचत गटाच्या वतीने जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांना निवेदनाव्दारे केली आहे.

दारू दुकान हद्दपार करा...!
दाभाडी : बदनापूर तालुक्यातील दाभाडी गावातील देशी दारूचे दुकान गावाबाहेर हटविण्याची मागणी गावातील महिला बचत गटाच्या वतीने जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांना निवेदनाव्दारे केली आहे.
शासनाने ५०० मीटरच्या आत असलेली दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे गावातील महिलावर्गातून स्वागत करण्यात येत आहे.
परंतु दारू दुकान चालकाने गावातील ग्रट क्रमांक ८६ मध्ये जागा घेऊन येथे दारूचे दुकान थाटल्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याला ग्रामस्थांचा विशेष करून महिलांचा विरोध असल्याने निवेदनात म्हटले आहे. या परिसरात आरोग्य केंद्र, शाळा महाविद्यालय असल्याने याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गावातील दारूमुळे तंटे वाढत असल्याने गावातील देशी दारूच्या दुकानाला गावाबाहेर हटविण्याची मागणी महिलांनी केली आहे. निवेदनावर व्दारकाबाई गाढे, चंद्रकलाबाई गाढे, कांताबाई जैस्वाळ, सुमन जैवाळ, मंदाबाई जैवाळ, आनंदाबाई जैवाळ, सुवर्णाबाई जैवाळ, जनाबाई जैवाळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)