शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

मोठी कारवाई! प्रदूषण रोखण्याकडे दुर्लक्ष, मराठवाड्यातील १७ कंपन्या बंद करण्याची नोटीस

By बापू सोळुंके | Updated: March 1, 2025 13:21 IST

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमाकडे दुर्लक्ष भोवले

छत्रपती संभाजीनगर : कोणत्याही कारखान्याद्वारे हवा, पाणी अथवा ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी संबंधित कंपनी व्यवस्थापनाची आहे. असे कारखान्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मराठवाड्यातील १७ कारखान्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) क्लोजर नोटीस बजावली आहे.

कोणताही कारखाना सुरू करायचा असेल तर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा परवाना घेणे संबंधित कारखान्यांना बंधनकारक आहे. एवढेच नव्हे तर कारखान्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते. कारखान्यातील रसायनयुक्त पाणी थेट नदी, नाल्यात सोडता येत नाही. एवढेच नव्हे तर हे पाणी जमिनीत झिरपणार नाही, याची खबरदारी कारखान्याने घेणे आवश्यक असते. यासाठी पाणी प्रक्रिया युनिट उभारणे कंपन्यांना बंधनकारक असते, तसेच कारखान्याच्या बॉयलरमधून निघणारा धूर हवेत सोडण्याचीही एक पद्धत आहे. कारखान्यांना विशिष्ट उंचीची चिमणी उभारणे बंधनकारक असते. शिवाय कारखान्याच्या धुरामुळे हवेचे प्रदूषण कमीत कमी होईल, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी कंपनीची असते. अनेक कंपन्यांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येते.

मंडळाच्या निरीक्षकाकडून कंपनीला भेट दिली जाते तेव्हा आणि कंपनीविरोधात तक्रार आल्यानंतर असे प्रकार उघडकीस येतात. मग एमपीसीबीकडून कंपनीला प्रदूषण रोखण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात येते. अशा प्रकारे मराठवाड्यातील १७ कंपन्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येते. प्रथम कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या. मागील वर्षभरात नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तरीही या कंपन्यांनी प्रदूषण रोखण्यासाठी विशेष कार्यवाही केली नाही. यामुळे या कंपन्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. कंपन्यांना त्यांचे कारखाने बंद करण्याच्या नोटिसा एमपीसीबीकडून बजावण्यात आल्याची माहिती एमपीसीबीचे प्रादेशिक अधिकारी मनीष होळकर यांनी दिली.

वीज आणि नळ कनेक्शन तोडण्याचे निर्देशमराठवाड्यातील १७ कारखान्यांना कारखाने बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी संबंधित कारखान्याची वीज आणि नळ कनेक्शन तोडण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत.- मनीष होळकर, प्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी

या कारखान्यांना क्लोजर नोटिसाएम.एस. मॅगनस इंडस्ट्रीज पडेगाव, सनशाईन इंडस्ट्रीज वाळूज, श्री काशी विश्वनाथ प्रोजेक्ट प्रा. लि., ब्राइट रेज पेट्रोलियम कॉर्पोरेशन नांदेड, मेटल इंजिनिअरिंग युनिट तुर्काबाद खराडी, जय हिंद शुगर प्रा. लि. गंगापूर, क्रिस्टल केमिकल्स प्रा. लि. पैठण एमआयडीसी, शालिनी केमिकल्स प्रा. लि. पैठण एमआयडीसी, औरंगाबाद अलॉय प्रा.लि., वरद इंटरप्रायजेस छत्रपती संभाजीनगर, एस.आर.एल. कन्स्ट्रक्शन प्रा.लि. जालना, गजकेसरी स्टील ॲण्ड अलॉय प्रा.लि. जालना., शिक्षण महर्षी ज्ञानदेवश मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीज प्रा.लि. लातूर, ए.यू. इंडस्ट्रीज छत्रपती संभाजीनगर आणि श्री दत्तकृपा बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स प्रा. नांदेड.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMarathwadaमराठवाडाpollutionप्रदूषण