पर्यूषण पर्व समाप्तीनिमित्त शोभायात्रा
By Admin | Updated: September 11, 2014 00:41 IST2014-09-11T00:40:08+5:302014-09-11T00:41:46+5:30
नांदेड : दहा दिवसांच्या पर्यूषण पर्वाच्या समाप्तीप्रसंगी बुधवारी शहरातील रतनगर भागातील जैन मंदिरापासून तरोडा नाक्यापर्यंत जैन समाजबांधवांनी शोभायात्रा काढली़

पर्यूषण पर्व समाप्तीनिमित्त शोभायात्रा
नांदेड : दहा दिवसांच्या पर्यूषण पर्वाच्या समाप्तीप्रसंगी बुधवारी शहरातील रतनगर भागातील जैन मंदिरापासून तरोडा नाक्यापर्यंत जैन समाजबांधवांनी शोभायात्रा काढली़ या शोभायात्रेत कलशधारी महिलांचा सहभाग होता़
रतननगर येथील मंदिरात गेल्या दहा दिवसांपासून परमपूज्य माताजी कुशलवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यूषण पर्वाचे आयोजन करण्यात आले होते़ त्याची समाप्ती बुधवारी शोभायात्रेद्वारे करण्यात आली़ जगा आणि जगू द्या, मानव जन्माने नाही तर कर्माने महान होतो, अहिंसा परमो धर्म असा जयघोष करीत शोभायात्रेत शेकडो जैन समाजबांधवांनी सहभाग घेतला होता़
यावेळी पांरपरिक वेषभूषेतील महिलांनी शोभायात्रेत दांडिया नृत्य सादर केले़ त्यापूर्वी अभिषेक करण्यात आला आहे़ तरोडा नाका येथून मंदिर पोहचल्यानंतर शोभायात्रेचे विसर्जन करण्यात आले़ यावेळी विकास मुधळे, विकास यमल, शिरिष यमल, सुहास माद्रव, डॉ़अनिल पाटील, रत्नमाला बांडे, नीता वायकोस, उर्मिला यमल, पद्माकर इंदलवाड यांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)