सामूहिक विवाह सोहळ्यात ५३५ जोडप्यांचे शुभमंगल

By Admin | Updated: May 3, 2016 00:43 IST2016-05-03T00:43:41+5:302016-05-03T00:43:41+5:30

सिल्लोड : आ.अब्दुल सत्तार मित्रमंडळ आणि नॅशनल एज्युकेशन सोसायटीतर्फे १ मे रोजी आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ५३५ जोडप्यांचे थाटात लग्न लागले.

Shubhamangal of 535 couples at the group wedding | सामूहिक विवाह सोहळ्यात ५३५ जोडप्यांचे शुभमंगल

सामूहिक विवाह सोहळ्यात ५३५ जोडप्यांचे शुभमंगल


सिल्लोड : आ.अब्दुल सत्तार मित्रमंडळ आणि नॅशनल एज्युकेशन सोसायटीतर्फे १ मे रोजी आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ५३५ जोडप्यांचे थाटात लग्न लागले. नवदाम्पत्यांना संसारोपयोगी १०० वस्तू, पलंग-गादी आणि भांडी देण्यात आली.
सिल्लोड येथे तेरा वर्षांपासून आ. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने सत्तार मित्रमंडळ व नॅशनल एज्युकेशन सोसायटीतर्फे या सामूहिक विवाह सोहळ््याचे आयोजन केले जाते. यावर्षी दुष्काळ असल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या अल्पसंख्याक समाजातील मंडळींना उपवर वधू,वरांच्या लग्नाची चिंता होती. या लग्नसोहळ्यात तब्बल ५३५ जोडप्यांचे विवाह लावण्यात आले. याप्रसंगी मौलाना गुलाम मोहंमद वस्तानवी व मौलाना यादवी यांनी नवदाम्पत्यांच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना केली.
या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, माजी प्रदेश अध्यक्ष आ.माणिकराव ठाकरे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम, आ. अर्जुनराव खोतकर, आ.प्रशांत बंब,आ.भाऊसाहेब चिकटगावकर, आ. सुभाष झांबड, जिल्हाधिकारी निधी पांडे, प्रदेश उपाध्यक्ष केशवराव औताडे, माजी खा.उत्तमसिंग पवार, रामकृष्णबाबा पाटील, सुरेश पाटील, माजी आ. सांडू पाटील लोखंडे, सुरेशकुमार जेथलिया, नितीन पाटील, सिराज देशमुख, एम. एम. शेख, तहसीलदार संतोष गोरड, उपजिल्हाधिकारी विपीन ईटणकर, जि.प. अध्यक्ष श्रीराम महाजन, प्रभाकर पालोदकर, माजी आ.कल्याण काळे, जितसिंग करकोटक आदींची उपस्थिती होती.

Web Title: Shubhamangal of 535 couples at the group wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.