साडीत दिसल्या श्रुती मराठेच्या मोहक अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:05 IST2021-02-23T04:05:02+5:302021-02-23T04:05:02+5:30

अभिनेत्री श्रुती मराठेने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती 'श्रुती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे. श्रुती ...

Shruti Maratha's charming performance seen in saree | साडीत दिसल्या श्रुती मराठेच्या मोहक अदा

साडीत दिसल्या श्रुती मराठेच्या मोहक अदा

अभिनेत्री श्रुती मराठेने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती 'श्रुती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे. श्रुती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. श्रुती इन्स्टाग्रामवर आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. अलीकडेच तिने साडीतले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोत श्रुतीच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. पर्पल रंगाची साडी श्रुतीवर उठून दिसतो आहे.

गाण्यांचा ‘खरा नायक’ उपेक्षितच

'मैं ना भूलूंगा', 'तेरा साथ है तो', 'मेघा रे मेघा', 'एक प्यार का नगमा है', मुहब्बत है क्या चीज' आणि 'जिंदगी की ना टूटे लड़ी' सारखी अवीट गाणी लिहणारे संतोष आनंद मोठ्या हलाखीत जीवन जगत असल्याचे पुढे आले आहे. वयाच्या या टप्प्यावर संतोष यांचं शरीरही त्यांची साथ देत नाही. शिवाय त्यांच्याकडे आता कोणतंही काम नाही. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असताना बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिने त्यांना मदतीचा हात दिला आहे. संतोष यांना नेहाने ५ लाख देण्याची घोषणा एका कार्यक्रमादरम्यान केल्याने तीचे कौतुक होत आहे.

रुबीना दिलैक ठरली विजेती

बिग बॉसच्य़ा चौदाव्या सिझनचा ग्रॅण्ड फिनाले नुकताच मोठ्या जल्लोषात पार पडला. चाहत्यांची सर्वाधिक पसंती मिळवत अभिनेत्री रुबीना दिलैक बिग बॉसच्या चौदाव्या पर्वाची विजेती ठरली आहे. राहुल वैद्यला टक्कर देत रुबीनाने विजेते पदाची ट्रॉफी पटकावली आहे. तब्बल 140 दिवस हा शो चालला. बिग बॉसच्या पर्वांमधील सर्वाधिक दिवसांचं हे पर्व ठरलं आहे. 12 स्पर्धकांपासून या पर्वाला सुरुवात झाली होती. मात्र शोमध्ये रंगत आणण्यासाठी कालांतराने शोमध्ये काही कलाकारांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली. शोच्या सुरवातीपासूनच रुबीनाने तिच्या दमदार परफॉर्मन्सने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.

Web Title: Shruti Maratha's charming performance seen in saree