श्रीकृष्ण-रूख्मीणीनगरात भरदिवसा घरफोडी

By Admin | Updated: September 9, 2015 00:27 IST2015-09-09T00:11:38+5:302015-09-09T00:27:27+5:30

जालना : शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून मंगळवारी चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून पोलिसांना आव्हान दिले आहे.

Shrikrishna-Rakhaminnagaragarabhadhiya Gharghadi | श्रीकृष्ण-रूख्मीणीनगरात भरदिवसा घरफोडी

श्रीकृष्ण-रूख्मीणीनगरात भरदिवसा घरफोडी


जालना : शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून मंगळवारी चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून पोलिसांना आव्हान दिले आहे.
शहरातील श्रीकृष्ण- रूख्मीणीनगरातील रहिवाशी दत्ता काशीगीर गिरी व त्यांच्या पत्नी नोकरीस गेलेल्या होत्या. त्यांच्या घराला कुलूप पाहून चोरट्यांनी मंगळवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान पाठीमागील दाराचा कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला.
तसेच आतील चार खोल्यांचे दरवाजे तोडून घरांची झडती घेवून कपाटे फोडले. या चोरीत चोरट्यांनी रोख २५ हजार रूपये व १० तोळे सोन्याचे विविध दागिने असा एकूण १ लाख ४५
हजार रुपयांचा एवज लंपास केला.
घरमालक अप्पा गिरी हे दुपारी १ वाजेच्या सुमारास घरी आल्यानंतर त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. तेव्हा त्यांनी ही बाब दत्ता गिरींना कळविली. त्यांनी घरी येवून पाहणी
केली. याबाबत पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यावरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
(चोऱ्यांचे सत्र सुरूच/४)

Web Title: Shrikrishna-Rakhaminnagaragarabhadhiya Gharghadi