श्रेयसच्या आईने पहिल्यांदाच दिली सेटला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:02 IST2021-03-07T04:02:06+5:302021-03-07T04:02:06+5:30

श्रेयस तळपदे गेली अनेक वर्षे चित्रपट, मालिकांमध्ये काम करत असला तरी त्याची आई त्याच्या चित्रीकरणाच्या ठिकाणी गेली नव्हती; पण ...

Shreyas' mother gave the set the first time | श्रेयसच्या आईने पहिल्यांदाच दिली सेटला भेट

श्रेयसच्या आईने पहिल्यांदाच दिली सेटला भेट

श्रेयस तळपदे गेली अनेक वर्षे चित्रपट, मालिकांमध्ये काम करत असला तरी त्याची आई त्याच्या चित्रीकरणाच्या ठिकाणी गेली नव्हती; पण आता श्रेयसच्या आईने त्याच्या चित्रपटाच्या सेटवर आयुष्यात पहिल्यांदाच भेट दिली आहे. याचा श्रेयसला प्रचंड आनंद झाला असून, त्यानेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे. श्रेयसने त्याच्या आईसोबतचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, पुष्करमधील सावित्रीदेवीच्या मंदिरात माझी खऱ्या आयुष्यातील आई आणि चित्रपटातील आई... माझ्या २० वर्षांच्या कारकीर्दीत पहिल्यांदा माझ्या आईने माझ्या चित्रपटाच्या सेटला भेट दिली. याशिवाय दुसरा कोणता आनंद असूच शकत नाही.

ग्लॅमरस दिसतेय प्रार्थना बेहरे

प्रार्थना बेहरेने सोशल मीडियावर ग्रे कलरच्या वनपीसमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. फोटोंमधील प्रार्थनाच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत. नेहमीप्रमाणे प्रार्थनाचे हे फोटोशूट पाहून चाहते फिदा झाले आहेत. काही वेळातच हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालेय. वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले, तर प्रार्थना लवकरच छुमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे. यात तिच्यासोबत रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाच्या काही सीन्सचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. त्याचबरोबर ती एका हिंदी बेवसिरीजमध्येदेखील दिसणार आहे.

सुकन्याने शेअर केले बोल्ड फोटो

मराठी चित्रपटसृष्टीतील नृत्यांगना सुकन्या काळण हिने आपल्या नृत्यातील दिलखेचक अदांमधून रसिकांना घायाळ केले आहे. सुकन्याने काही महिन्यांपूर्वी न्यूड व बोल्ड फोटोशूट शेअर करून साऱ्यांनाच धक्का दिला होता. न्यूड फोटोशूटमुळे तिची प्रचंड चर्चा झाली होती. सुकन्याच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत असते. आता पुन्हा तिने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोंमध्ये सुकन्या खूपच बोल्ड दिसत आहे. नेहमीप्रमाणे या फोटोतील तिच्या अदांनी फॅन्सना क्लीन बोल्ड केले आहे. आधी न्यूड फोटोशूटमुळे तिची प्रचंड चर्चा झाली होती. आता पुन्हा तिने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Web Title: Shreyas' mother gave the set the first time