श्राव्या, श्रेयस, अभिरभानू यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:20 IST2018-02-10T00:20:25+5:302018-02-10T00:20:58+5:30
सातारा येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय ट्रायथलॉन स्पर्धेत औरंगाबादच्या श्राव्या यादव, श्रेयस निर्वळ, अभिरभानू धारवाडकर यांनी आपापल्या गटात कास्यपदक पटकावले. विशाखापट्टणम येथे ९ ते १२ मार्चदरम्यान होणाºया सिनिअर राष्ट्रीय स्पर्धेसाठी श्राव्या यादव हिची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.

श्राव्या, श्रेयस, अभिरभानू यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
औरंगाबाद : सातारा येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय ट्रायथलॉन स्पर्धेत औरंगाबादच्या श्राव्या यादव, श्रेयस निर्वळ, अभिरभानू धारवाडकर यांनी आपापल्या गटात कास्यपदक पटकावले. विशाखापट्टणम येथे ९ ते १२ मार्चदरम्यान होणाºया सिनिअर राष्ट्रीय स्पर्धेसाठी श्राव्या यादव हिची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. श्रेयश निर्वळ व अभिरभानू हे ज्युनिअर व सबज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. सातारा येथील स्पर्धेत नकुल पालकर, हर्षिलसिंग डिंगरा, अनिश शुक्ला, अजयसिंग पाल, अंजना शिंदे, आशिष जाधव यांनीही चांगली कामगिरी केली. पदकविजेत्या खेळाडूंचे औरंगाबाद जिल्हा ट्रायथलॉन संघटनेचे अध्यक्ष आ. अतुल सावे, राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष अभय देशमुख, जिल्हा संघटनेचे सचिव संदीप जगताप, नामदेव सोनवणे, सचेंद्र शुक्ला, किरण शूरकांबळे, मीनाक्षी यादव, चरणसिंग संघा, भिकन आंबे, सीमा देशमुख आदींनी अभिनंदन केले आहे.