शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

अर्ध्या मराठवाड्यात श्रावणसरी; अनेक जिल्ह्यांत सूर्यदर्शनच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 13:54 IST

परभणी, नांदेड, लातूर, औरंगाबादेत पाऊस

ठळक मुद्देसतंतधार पावसाने पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. सिद्धेश्वर धरणाच्या १४ दरवाजांपैकी आठ दरवाजे उघडण्यात आले

औरंगाबाद : लातूर, परभणी, नांदेड व औरंगाबादेत श्रावणसरी कोसळल्याने अर्धा मराठवाडा चिंब झाला. अनेक ठिकाणी सूर्यदर्शनच झाले नाही. तसेच पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे.

लातूर :  रिमझिम लातूर : जिल्ह्यात आठवडाभरापासून होत असलेल्या रिमझिम पावसामुळे खरीप हंगामातील पिके बहरली आहेत़ मूग दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे, तर सोयाबीन फुलो-यात आहे़ काही ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी कीडनाशकांची फवारणी करीत आहेत़ या पावसामुळे त्यात व्यत्यय येत असून आणखीन किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतक-यांतून व्यक्त होत आहे़ 

परभणी : पिकांना दिलासापरभणी : जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशीही भीज पाऊस होत आहे. या पावसामुळे सोयाबीन-कापूस या दोन्ही पिकांना दिलासा मिळाला असून, पिकांच्या वाढीसाठी पाऊस पोषक मानला जात आहे. चार दिवसांपासून संततधार पाऊस होत असल्याने भूजल पातळीत कमालीची वाढ झाली असून, प्रकल्पांतील पाणीसाठाही वाढला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ५०४ मि.मी. पाऊस झाला. या पावसामुळे जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पात ९९.५४ टक्के पाणीसाठा झाला.

नांदेड : भोकरला सर्वाधिकनांदेड : जिल्ह्यात रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १३़६ मि़मी़ पावसाची नोंद झाली़ यात सर्वाधिक भोकर तालुक्यात ४३़१ मि़मी़ पाऊस झाला़ हिमायतनगर तालुक्यात २० मि़मी़, देगलूर तालुक्यात १६़८ मि़मी़, किनवट १५़६ मि़मी़, नांदेड ८ मि़मी़, बिलोली १०़७ मि़मी़, मुखेड १२़६ मि़मी़, कंधार ५़३ मि़मी़, हदगाव १२़३ मि़मी़, मुदखेड १०़९ मि़मी़, हिमायतनगर २० मि़मी़, माहूर ११़४ मि़मी, धर्माबाद १८़१ मि़मी़, उमरी २०़२ मि़मी़, अर्धापूर १२़६ मि़मी़ आणि नायगाव तालुक्यात ११़४ मि़मी़ पावसाची नोंद झाली आहे़ 

हिंगोली : जलसाठा वाढलाकळमनुरी/ औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : यावर्षी मृग नक्षत्रापासूनच दमदार पाऊस पडत आहे़ मागील २ ते ३ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे़ त्यामुळे जलस्तर वाढला आहे़ पावसामुळे इसापूर धरणाचा पाणीसाठा वाढतच चालला आहे़ धरणात सध्या ५७़ ६१ टक्के जलसाठा आहे़ 

‘सिद्धेश्वर’चे दरवाजे उघडलेऔंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाच्या १४ दरवाजांपैकी आठ दरवाजे उघडण्यात आले असून, याद्वारे ८ हजार ९१३ क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीत सोडण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरल्याने मागील चार दिवसांपासून टप्प्याटप्प्याने धरणाचे दरवाजे उघडले जात आहेत. 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसDamधरण