श्रमगौरव पुरस्काराने एम. ए. गफार सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:31 IST2020-12-17T04:31:03+5:302020-12-17T04:31:03+5:30

सर्वसाधारण कामगारापासून ते स्थानिक कामगार संघटनेचा पदाधिकारी व पुढे स्वतःच्या कर्तृत्वाने मराठवाडा, महाराष्ट्र, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगारांसाठी ...

Shramgaurav Award to M. A. Gaffar honored | श्रमगौरव पुरस्काराने एम. ए. गफार सन्मानित

श्रमगौरव पुरस्काराने एम. ए. गफार सन्मानित

सर्वसाधारण कामगारापासून ते स्थानिक कामगार संघटनेचा पदाधिकारी व पुढे स्वतःच्या कर्तृत्वाने मराठवाडा, महाराष्ट्र, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगारांसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन निवड समितीने गफार यांची कामगार चळवळ या विभागातून एकमताने निवड केली होती.

मुंबईच्या परळ येथील महात्मा गांधी सभागृहात आयोजित कार्यक्रमात बच्चू कडू यांच्या व माजी मंत्री सचिन अहिर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

मुंबईतील बँक कर्मचाऱ्यांचे नेते विश्वास उटगी यांना जीवनगौरव पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्य विभाग, साहित्य विभाग, कला व क्रीडा विभागातून अनुक्रमे महेश शेवलीकर (औरंगाबाद ), संजय गोरडे (नाशिक ), मकरंद नाईक (रायगड ), मोनिका आधरे यांना याच कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

Web Title: Shramgaurav Award to M. A. Gaffar honored