अपघाताच्या धक्क्यात विरले मुख्यमंत्र्यांचे श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2017 00:31 IST2017-05-26T00:29:48+5:302017-05-26T00:31:36+5:30

लातूर : निलंगा तालुक्यातील हलगरा येथे पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमातील श्रमदानाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली.

Shramdaan of the Chief Minister of Assam | अपघाताच्या धक्क्यात विरले मुख्यमंत्र्यांचे श्रमदान

अपघाताच्या धक्क्यात विरले मुख्यमंत्र्यांचे श्रमदान

लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : निलंगा तालुक्यातील हलगरा येथे पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमातील श्रमदानाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. जवळपास २० ते २५ मिनिटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जय भवानी मित्र मंडळाचे कार्यकर्ते आणि गावकऱ्यांसमवेत श्रमदान केले. मात्र हेलिकॉप्टर अपघाताच्या धक्क्यात मुख्यमंत्र्यांनी केलेले श्रमदान विरले.
मराठवाड्यातील भाजपाच्या शेतकरी संवाद सभेच्या निमित्ताने मुख्यमंत्री निलंग्यात मुक्कामी होते. हलगरा, औराद शहाजानी, अनसरवाडा आदी गावांत संवाद सभा घेऊन विविध विकास कामांची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. हलगरा येथे आयोजित श्रमदान कार्यक्रमातही शेतकऱ्यांशी संवाद साधला. हलगरा गावातील गावकऱ्यांनी लोकसहभागातून केलेल्या जलयुक्त शिवारच्या कामाचे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले. झालेले काम हे आदर्शवत आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची संवाद सभाही झाकोळून गेली...
विकास कामांच्या पाहणीबरोबरच मुख्यमंत्र्यांची शेत-शिवार संवाद सभा होती. राज्यभरात गुरुवारीच या संवाद सभेला सुरुवात झाली. लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मराठवाड्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शेत-शिवार संवाद सभेतून केंद्र व राज्याने शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
४केंद्र व राज्य शासनाने गेल्या अडीच-तीन वर्षांत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारपेक्षा मोठ्या फरकाने निधी खर्च करून शेतकरी कर्जमुक्तीच्या वाटेवर आणल्याचे या सभेतून सांगण्यात आले. मात्र अपघातामुळे संवाद सभा आणि श्रमदान विरले.

Web Title: Shramdaan of the Chief Minister of Assam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.