२१ शिक्षकांना कारणे दाखवा

By Admin | Updated: January 7, 2015 01:02 IST2015-01-07T00:41:58+5:302015-01-07T01:02:10+5:30

बीड : मुकबधिर व मतिमंद निावसी विद्यालयातील शिक्षक, संस्थाचालक यांच्यातील वाद चिघळला आहे. पूर्वकल्पना न देता विद्यालयात गैरहजर राहून उपोषण करणाऱ्या

Show reasons for 21 teachers | २१ शिक्षकांना कारणे दाखवा

२१ शिक्षकांना कारणे दाखवा


बीड : मुकबधिर व मतिमंद निावसी विद्यालयातील शिक्षक, संस्थाचालक यांच्यातील वाद चिघळला आहे. पूर्वकल्पना न देता विद्यालयात गैरहजर राहून उपोषण करणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांना सोमवारी संस्थेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दुसरीकडे सीईओ नामदेव ननावरे यांनी संस्थेला नोटीस धाडली आहे.
राजे संभाजी बहूउद्देशिय सेवाभावी संस्थेचे बीड येथे रुख्माईगोविंद मतिमंद निवासी तसेच मुकबधिर निवासी विद्यालय आहे. या दोन्ही संस्थांमधील काही कमर्चारी १ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. मात्र, उपोषणाला बसण्यापूर्वी त्यांनी संस्थेला कळविले नाही. परिणामी शालेय व्यवस्थापन कोलमडले. मुकबधीर व मतिमंद विद्यार्थी हे सर्वसाधारण विद्यार्थ्यांपेक्षा वेगळे असतात. त्यामुळे त्यांची विशेष देखभाल करावी लागते. दोन्ही संस्थेतील विद्यार्थी निवासी असताना त्यांच्या सेवासुश्रूषेचा विचार न करता कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्याचे नोटिशीत संस्था सचिव शिवाजी चव्हाण यांनी नमूद केले आहे.
यांना बजावली नोटीस...
रुख्माईगोविंद मतिमंद विद्यालयातील ९ तर मुकबधिर विद्यालयातील १२ जणांना संस्थेने नोटिसा दिल्या. मतिमंद विद्यालयातील वरिष्ठ अधीक्षक सुभाष निर्मळ, शिक्षक गोरख डिसले, मेघा शिंदे, गणेश शिंदे, मनोहर करांडे, लिपीक विजय बन्सोडे, काळजीवाहक गोपीनाथ काळकुटे, अजम पठाण, सफाईगार शाहू चांदणे यांचा समावेश आहे. मुकबधिर विद्यालयामधील आर. एस. पाटील, आर. आर. शिंदे, बी. बी. ढगे, ए.एस. भराडे, आर. व्ही. जाधव, आर.आर. खांडे, एम. के. शिंदे, एस. व्ही. राठोड, वाय. एस. शिंदे, बी. बी. तोटे, आर. डी. गर्कळ, ए. जे. पोकळे यांचा समावेश आहे.
संस्था बंद पाडण्याचा डाव
राजे संभाजी बहूउद्देशिय सेवाभावी संस्थेचे सचिव शिवाजी चव्हाण यांनी उपोषणकर्त्या कर्मचाऱ्यांनी संस्थेला वेठीस धरल्याचा आरोप केला आहे. संस्था बदनाम करुन बंद पाडण्याचा त्यांचा डाव असल्याचा दावाही त्यांनी केला़ विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत परंतु शिक्षक खोडा घालतात, असे ते म्हणाले़

Web Title: Show reasons for 21 teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.