विस्तार अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस
By Admin | Updated: March 30, 2015 00:43 IST2015-03-30T00:34:15+5:302015-03-30T00:43:19+5:30
लातूर : ग्रामसेवक बी़एस़ वाघमारे यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण प्रकरणी जिल्हा परिषदेच्या वतीने संयुक्त चौकशी समितीच्या वतीने अहवाल सादर करण्यात आला़

विस्तार अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस
लातूर : ग्रामसेवक बी़एस़ वाघमारे यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण प्रकरणी जिल्हा परिषदेच्या वतीने संयुक्त चौकशी समितीच्या वतीने अहवाल सादर करण्यात आला़ या चौकशी अहवालाच्या अधारे ७ मार्च रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत यांनी संबंधीत विस्तार अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे़
निलंबित ग्रामसेवक बी़एस़ वाघमारे यांचे थकीत पगाराचे बिल काढण्यासाठी विस्तार अधिकाऱ्यांनी पैशाची मागणी केली. या मागणी संदर्भात झालेला संवाद सीडीद्वारे वाघमारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. दरम्यान, वाघमारे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई झाली होती. यात ते निलंबित झाले होते. अन्याय झाला म्हणून ते जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसले होते. या उपोषणाची दखल घेत संयुक्त चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आला. या अहवालानुसार विस्तार अधिकारी एस.बी. हाके व वरिष्ठ सहाय्यक सोमवंशी दोषी असल्याचा ठपका आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या वतीने विस्तार अधिकारी हाके व वरिष्ठ सहाय्यक सोमवंशी यांना नोटिसा पाठविण्यात आल्या असून, सात दिवसांच्या आत समाधानकारक खुलासा करावा, असे निर्देश पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.(प्रतिनिधी)